ETV Bharat / state

Devendra Fadnavis On Unseasonal Rain : अवकाळीने झोडपलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अवकाळी पावसामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये सुमारे 13000 हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हवी आहे. या संदर्भात राज्य सरकार संबंधितांकडून अहवाल मागवून लवकरात लवकर मदत देईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिले. विरोधकांनी उपस्थित केलेल्या स्थगन प्रस्तावाच्या चर्चेवरील मागणी दरम्यान ते बोलत होते.

Devendra Fadnavis On Unseasonal Rain
अवकाळीने झोडपलेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देणार
author img

By

Published : Mar 8, 2023, 1:33 PM IST

मुंबई : अवकाळी पावसामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात विविध जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. तसेच या प्रश्नावर नियम 257 प्रस्ताव दाखल करून घ्यावा आणि सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी अशी मागणी विरोधकांनी जोरदारपणे केली. राज्यात शेतकऱ्यांची 'जगावे की मरावे' अशी परिस्थिती; शेतकऱ्यांना काय मदत देणार आहे. हे तात्काळ जाहीर करा अशी मागणी अजित पवार यांनी केली.

कुठे झाले नुकसान ? : गेल्या दोन दिवसात नाशिक, धुळे, बुलडाणा, पालघर, बीड, जालना, पुणे, अहमदनगर, वाशिम, सोलापूर व राज्यातील इतर भागात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा, गहू, हरभरा, सोयाबीन, मका, तूर, केळी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच कापणीला आलेला गहू जमिनदोस्त झाला आहे, आंबा, काजू, द्राक्षे, केळी, संत्रा,‍ लिंबू, पपई, कलिंगड यासारख्या अनेक फळपीकांबरोबरच हरभरा, तूर, मका, वाल, चवळी, पावटा व इतर रब्बी पालेभाज्या यांचेही नुकसान झालेले आहे.

वीज पडून मृत्यू : वीज अंगावर पडून पशुधन दगावली आहे. मेंढ्यासुद्धा मृत झाल्या आहेत. आंबा, काजू सारख्या पिकांचा मोहोर, व संत्रा लिंबू यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी दुहेरी अडचणीत सापडल्याने सरकारने या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी अजित पवार यांनी केली. राज्य सरकार रंगाची होळी खेळत होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या पिकांची होळी होत होती. नाशिकमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी आपल्या कांद्याच्या पिकाची होळी केली. अशा शब्दात आमदार छगन भुजबळ यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.

शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार : गेले तीन दिवस अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले. आतापर्यंत राज्यात 13 हजाराहून अधिक हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये विविध पिकांचे नुकसान झाले असून त्याबाबतची आकडेवारी हाती घेत आहे. अजून नुकसानीची आकडेवारी येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. यासंदर्भात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना तातडीने मदत करणार असून शेतकऱ्यांना निश्चितच मदत केली जाईल असे सांगतानाच या प्रश्नाचे कुणीही राजकारण करू नये तुमच्या काळात तुम्ही चक्रीवादळाने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप पैसे दिले नाहीत याची आठवणही यावेळी फडणवीस यांनी करून दिली.

हेही वाचा : Mumbai News: दर्शन सोळंकी मृत्यूसंदर्भात अवैज्ञानिक अहवाल, आंबेडकर पेरियार स्टडी सर्कल विद्यार्थ्यांनी केला निषेध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.