मुंबई - अरबी समुद्रामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर चक्रीवादळ निर्माण झाले आहे. हे वादळ महाराष्ट्रात धडकण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शासनाने एनडीआरफच्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) 20 तुकड्या मुंबई ठाणेसह कोकणातील जिल्ह्यात तैनात केले आहेत.
तैनात 20 तुकड्यांपैकी मुंबई येथे 8, रायगड जिल्ह्यात 5 तुकड्या, पालघर जिल्ह्यात 2, ठाणे जिल्ह्यात 2, रत्नागिरी जिल्ह्यात 2 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक तुकडी तैनात करण्यात आली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकन किनारपट्टीत राहणाऱ्या सर्वांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, सर्व मच्छिमार सुखरुप आपापल्या घरी परतले आहेत. लोकांनी दोन दिवस घरातून बाहेर पडू नये. हा चक्रीवादळ असल्याने उघड्यावर कोणतेस साहित्य ठेवू नये, घराबाहेर जर काही साहित्य असेल तर ते घरात ठेवा किंवा बांधून ठेवा. घराबाहेर कोणीच पडू नका, असे आवाहन केले.
हेही वाचा - Live Update 'निसर्ग': राज्यात एनडीआरएफच्या २० तुकड्या तैनात, मराठवाड्यातही अतिवृष्टीचा इशारा