मुंबई : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आपच्या नेत्यांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. त्यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, शरद पवार यांचे आभार मानतो. त्यांच्या सर्व नेत्यांसोबत देखील चर्चा झाली. दिल्लीच्या नागरिकांवर अन्याय सुरु आहे. २३ मे २०१५ मध्ये एक नोटिफिकेशन्स काढून केंद्राने राज्याचे सर्व अधिकार काढून घेतले. ८ वर्षांपासून आम्ही सुप्रीम कोर्टाचा चक्कर मारत होतो. सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण निर्णय दिल्लीच्या जनतेच्या बाजुने दिला. त्या निर्णयाला बाधा आणणार ८ दिवसांत केंद्राने निर्णय घेत पुन्हा सर्व अधिकार काढून घेतले.
राज्यसभेत हे विधेयक नामंजूर करा : हे विधेयक लोकसभा व राज्यसभेत मंजुरीसाठी येईल. त्यावेळी ते नामंजूर करण्याचे आवाहन आज शरद पवारांना केले आहे. पवारांनी आश्वासन दिले आहे की, राज्यसभेत हे मंजूर होऊ देणार नाही. ही फक्त दिल्लीची लढाई नाही. तर भाजप विरहित सरकार तयार केली, की केंद्र ३ प्रकारे अन्याय करते. एक तर आमदार खरेदी केली जाते, दुसरे ईडी व केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने सरकार पाडले जाते. तिसरे अध्यादेश व कायदे आणून राज्याच्या अधिकारावर गदा आणली जाते.
-
ਤਾਨਾਸ਼ਾਹੀ ਦੇ ਖ਼ਿਲਾਫ਼ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਇੱਕ-ਜੁੱਟ ਕਰ ਰਹੇ ਹਾਂ... ਅੱਜ ਮੁੰਬਈ ਵਿਖੇ ਸ਼ਿਵ ਸੈਨਾ ਪ੍ਰਧਾਨ ਊਧਵ ਠਾਕਰੇ ਜੀ ਨਾਲ ਮੀਟਿੰਗ ਤੋਂ ਬਾਅਦ @ArvindKejriwal ਜੀ ਨਾਲ ਪ੍ਰੈੱਸ ਕਾਨਫਰੰਸ... https://t.co/mRvR8fZLHg
— Bhagwant Mann (@BhagwantMann) May 24, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ਤਾਨਾਸ਼ਾਹੀ ਦੇ ਖ਼ਿਲਾਫ਼ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਇੱਕ-ਜੁੱਟ ਕਰ ਰਹੇ ਹਾਂ... ਅੱਜ ਮੁੰਬਈ ਵਿਖੇ ਸ਼ਿਵ ਸੈਨਾ ਪ੍ਰਧਾਨ ਊਧਵ ਠਾਕਰੇ ਜੀ ਨਾਲ ਮੀਟਿੰਗ ਤੋਂ ਬਾਅਦ @ArvindKejriwal ਜੀ ਨਾਲ ਪ੍ਰੈੱਸ ਕਾਨਫਰੰਸ... https://t.co/mRvR8fZLHg
— Bhagwant Mann (@BhagwantMann) May 24, 2023ਤਾਨਾਸ਼ਾਹੀ ਦੇ ਖ਼ਿਲਾਫ਼ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਇੱਕ-ਜੁੱਟ ਕਰ ਰਹੇ ਹਾਂ... ਅੱਜ ਮੁੰਬਈ ਵਿਖੇ ਸ਼ਿਵ ਸੈਨਾ ਪ੍ਰਧਾਨ ਊਧਵ ਠਾਕਰੇ ਜੀ ਨਾਲ ਮੀਟਿੰਗ ਤੋਂ ਬਾਅਦ @ArvindKejriwal ਜੀ ਨਾਲ ਪ੍ਰੈੱਸ ਕਾਨਫਰੰਸ... https://t.co/mRvR8fZLHg
— Bhagwant Mann (@BhagwantMann) May 24, 2023
तर भाजपचे सरकार येणार: असा प्रकार देशाच्या संविधानासाठी हे घातक आहे. देशातील सर्व लोकांपर्यंत आम्ही जातो. आता ही विरोधी पक्षाची गोष्ट राहिली नसून, संपूर्ण देशाची झाली आहे. देशावर प्रेम करणार्या सर्वांना आम्ही एकत्र आणत आहोत. कुणालाही वाटणार नाही की, देश तुटावा किंवा देशाचे तुकडे पडावेत. शरद पवार यांचे समर्थन मिळेलच. पण पवारांनी इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. जर राज्यसभेत हे विधेयक नामंजूर झाले तर, २०२४ मध्ये भाजपचे सरकार येणार नाही. याची खात्री बाळगा. यांसदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व काँग्रेस नेते राहुल गांधी यांकडे उद्याच सकाळी भेटीसाठी वेळेची मागणी करून त्यांची भेट घेणार आहे.
केंद्रातील सत्तेचा गैरवापर: दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आहे. केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्या आपापल्या कक्षेतील अधिकारासंदर्भात संघर्ष पेटला आहे. दिल्लीतील अपच्या सरकारचे मर्यादित अधिकाराला मंजुरी देणाऱ्या केंद्र सरकारच्या जीआरला उद्धव ठाकरे यांचा गट राज्यसभेत विरोध करणार आहे. याविषयीची माहिती बुधवारी अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी दिली.
म्हणून अरविंद केजरीवाल आले: शरद पवार म्हणाले, मला राजकारणात ५६ वर्षे झाले आहे. कोणत्याही राज्यात गेलो तरी नेत्यांसोबत वैयक्तिक संपर्क येतो. निवडून आलेले सरकारचे अधिकार वाचविण्यासाठी हा प्रयत्न सुरु आहे. देशात संसदीय लोकशाही आहे, यावर आमचा विश्वास आहे. प्रजातंत्रात निवडून आलेल्या राज्य सरकारकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ही वेळ आहे लोकशाही वाचवण्याची, सरकार तयार करण्याचा, अधिकार व सामान्य जनतेचा मतदानाचा हक्क अबाधित राखण्यासाठी, अरविंद केजरीवाल येथे आले आहेत. महाराष्ट्राची जनता ही अरविंद केजरीवाल यांचे समर्थन करेल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस तर मदच करेलच असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.
राज्यपाल हे स्टार कँपेनर: आपल्या देशात जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे. पण दिवसेंदिवस हे लोकशाहीची हत्या करत आहेत. देशातील राज्यपाल हे स्टार कँपेनर झाले आहेत. तर राजभवन हे अड्डे झाले आहेत. राज्यपालांनी किती वेळा त्रास दिला याची माहिती घेतली जात आहे. लोक मतदानासाठी रांग का लावत आहेत. तर पंतप्रधान व काही राज्यपाल देश चालवणार असतील हे देशासाठी घातक आहे. देवाने देश प्रेमींना एकत्र येण्याची ही संधी दिली आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेकवेळा शरद पवारांनी मदत केली आहे. आज लोकशाहीवर संकट आले आहे. त्यामुळे शरद पवार हे मदत करतील. पवार हे लोकशाही वाचवतील अशी अपेक्षा आहे. जेव्हा भविष्यात कुणी विचारले तर, आम्ही सांगू की लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढलो होतो, अशा शब्दात पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी प्रतिक्रिया दिली.
देवाने देश प्रेमींना एकत्र येण्याची ही संधी दिली आहे. संकटातून बाहेर पडण्यासाठी अनेकवेळा शरद पवारांनी मदत केली आहे. पवार हे लोकशाही वाचवतील अशी अपेक्षा, भविष्यात कुणी विचारले तर, आम्ही सांगू की लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही लढलो होतो - मुख्यमंत्री भगवंत मान
बैठकीत राष्ट्रवादीची कोर कमिटी: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, खासदार राघव चड्डा, दिल्लीचे मंत्री आतिशी इतर नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, नेते अजित पवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, सुप्रिया सुळे, यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये चर्चा झाली.
हेही वाचा -
- Sanjay Raut देवेंद्र फडणवीसांवर गद्दरांची गाडी चालवण्याचे दिवस संजय राऊतांचा हल्लाबोल
- CM Arvind Kejriwal in Mumbai तरच दिल्लीतील सेवा नियंत्रणावरील अध्यादेशाचा राज्यसभेत पराभव होऊ शकतो
- New Parliament Inauguration राष्ट्रपतींच्या हस्ते नवीन संसद भवनाचे उद्घाटन व्हावे सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल