ETV Bharat / state

मराठा आरक्षणासाठी सर्वांच्या सहकार्याने न्यायालयीन लढाई लढू; शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची चर्चा - मराठा आरक्षण सुनावणी

'मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

maratha reservation
मराठा आरक्षणासाठी सर्वांच्या सहकार्याने न्यायालयीन लढाई लढू
author img

By

Published : Jan 8, 2021, 6:20 AM IST

Updated : Jan 8, 2021, 6:57 AM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा संघटना सरकारविरोधात आक्रमक झाल्या आहेत. या संघटनांकडून अनेकदा सरकारविरोधात रोषही व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्यासह शिष्टमंडळाने गुरुवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यावेळी 'मराठा समाजाला आरक्षणाची लढाई ही आपल्या सर्वांची आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन सहकार्याने न्यायालयीन लढ्यासाठी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची ही बैठक सह्याद्री अतिथीगृहात पार पडली त्यावेळी ठाकरे बोलत होते.

न्यायालयीन लढाई लढू; शिष्टमंडळासमवेत मुख्यमंत्र्यांची चर्चा
यावेळी नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री अनिल परब, ज्येष्ठ विधीज्ञ विजयसिंह थोरात, मुख्य सचिव संजय कुमार, शिष्टमंडळासोबत आमदार विनायक मेटे, विनोद पाटील यांच्यासह विविध प्रतिनिधी उपस्थित होते.

एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे-

मुख्यमंत्री म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे ही आमची ठाम भूमिका आहे. त्यासाठी राज्य शासन सर्व प्रयत्न करत आहे. आरक्षणाची न्यायालयीन लढाई लढण्यासाठी सर्व संघटनांनी एकत्र येऊन एक टिम म्हणून प्रयत्न केले जातील.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे, मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव राजेश लढ्ढा आदी उपस्थित होते.

Last Updated : Jan 8, 2021, 6:57 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.