ETV Bharat / state

Fall In Egg Prices : अंडी झाली स्वस्त, संडे हो या मंडे रोज खाओ अंडे..!

मुंबई गेल्या काही दिवसापासून अंड्यांच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईत शेकडा ६६० ते ६८ रुपये डझन येवढ्या दराने अंडी मिळत आहेत. तसेच पुढील काही दिवसात अंड्यांचे दर अजून कमी होण्याची शक्यता आहे. गेल्या तीन ते चार दिवसापासून अंड्यांचे दर खाली उतरले आहेत.

Fall in egg prices
अंड्यांचे दर दरात घसरण
author img

By

Published : Jan 27, 2023, 5:42 PM IST

मुंबई : गेल्या काही दिवसापासून अंड्यांचे दर सातत्याने वाढत होते. देशभरात कडाक्याच्या थंडीमुळे अंड्यांचे दर वाढ होत असल्याची चर्चा होती. मुंबईसह महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी अंड्याचे दर गेल्या काही दिवसापासून ८० रुपये डझन एवढे झाले होते. काही वर्षापासून अंड्यांच्या दरात एवढी मोठी वाढ कधीही झालेली नव्हती. मात्र, काही दिवसापूर्वी ६० रुपये डझन मिळणारी अंडी ८२ रुपये डझन मिळत होती. यामुळे सामान्य कुटुंबाला आर्थिक भुर्दंड बसत होता. व्यापारांना देखील याचा मोठा फटका बसला होता. खास करून रेस्टॉरंट, बार मालक, हातगाड्यांवर अंड्यांचे पदार्थ विकणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांना याचा मोठा फटका बसला होता. मात्र, गेल्या तीन ते चार दिवसात अंड्यांचे भाव कमी झालेले पाहायला मिळत आहेत.

४९० ते ५०० रुपये शेकडा दर : आज मुंबईत घाऊक बाजारात जवळपास ४९० ते ५०० रुपये शेकडा अशा भावाने अंड्याला दर मिळत आहे. तर, किरकोळ बाजारात ६६ ते ६७ रुपये डझन अंड्यांचे दर आहेत. वाढलेल्या थंडीमुळे उत्तर भारतात अंड्यांची मागणी वाढली आहे. अंडी शरीरात उष्णता निर्माण करणारा अन्न असल्यामुळे उत्तर भारतातल्या लोकांकडून मोठ्या प्रमाणात अंड्यांची मागणी वाढल्याने अंड्याच्या दरात वाढ झाली होती.

दरवाढ विक्रमी : गेल्या काही दिवसात पशुखाद्याच्या दरामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. त्याचा फटका पोल्ट्री मालकांना देखील बसला आहे. त्याचा थेट भार अंड्यांच्या किमतीवर पडला आहे. मुंबई एग्स ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष आफताब अहमद खान यांनी दिलेल्या माहितीनुसार, दर हिवाळ्यात अंड्यांचे दर वाढतात. मात्र, तरीही सध्याची होणारी दरवाढ विक्रमी आहे. यावेळी उत्तर भारतातील राज्यात थंडीची लाट आल्याने यावर्षी सर्वाधिक अंड्याची मागणी आहे.

मुंबईत ६६० ते ६८ रुपये डझन अंडी : गेल्या तीन ते चार दिवसापासून अंड्यांच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईत शेकडा ६६० ते ६८ रुपये डझन येवढ्या दराने अंडी मिळत आहेत. तसेच पुढील काही दिवसात अंड्यांचे दर अजून कमी होण्याची शक्यता अहमद खान यांनी व्यक्त केली आहे. मुंबई, हैदराबाद येथे घाऊक अंड्यांचा व्यापार करणारे व्यापारी अब्दुल सत्तार यांनीही अंड्यांचे दर मुंबईत पुढील काही दिवसात अजून थोडे कमी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

अंड्यांचे दर कमी होणार : अंड्यांच्या दरवाढीला काही खासगी कंपन्या जबाबदार असल्याचे मत व्यापारी अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केले आहे. अंडी राज्यात, देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. मात्र, काही कंपन्यांच्या अरेरावीमुळे अंड्यांचे दर वाढले आहेत. मात्र आता ते पुन्हा नियंत्रणात आलेले आहेत. अंड्यांचे प्रमाण मुबलक असल्याने दरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तर, येणाऱ्या काही दिवसात डझनमागे अजून दोन ते तीन रुपये दर कमी होण्याची शक्यता अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली आहे.

उत्तर भारतात अंड्याची मागणी : महाराष्ट्रातच नाही तर देशभरात अंड्यांच्या किमतीत भरमसाठ वाढ झालेली पाहायला मिळत होती. मुंबईत 80 ते 85 रुपये डझन एवढ्या भावाने अंडी मिळत होती. देशभरात वाढत असलेल्या थंडीमुळे अंड्यांची मागणी वाढली आहे. मात्र, त्या मानाने अंड्यांचा तुटवडा असल्याने किमतीमध्ये वाढ झाली होती. मात्र पुढील दहा ते बारा दिवसात अंडी प्रत्येक राज्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असतील. उत्तरेत वाढलेल्या थंडीमुळे मोठ्या प्रमाणात अंड्याची आवक या राज्यांमध्ये झाली आहे.

अंड्यांचे दर कोसळायला सुरुवात : आता तेथेही अंड्याची आवक अधिक झाल्यामुळे अंड्यांचे दर कोसळायला सुरुवात झाली आहे. तीच परिस्थिती महाराष्ट्रातही पाहायला मिळेल. पुढील दहा ते बारा दिवसांमध्ये अंडी पुन्हा एकदा ६० ते ६२ रुपये डझन एवढ्या दरात मिळतील. तसेच १०० अंड्यांमागे जवळपास १२० ते १३० रुपये भाव खाली येतील असे मत ऑल इंडिया पोल्ट्री मार्केटचे अध्यक्ष अनिस खान यांनी व्यक्त केले आहे. तसेच अंडे निर्यात करणाऱ्या देशांपैकी भारत देखील एक देश आहे. सध्या अंड्याची निर्यात वाढत असल्याने त्याचा फटका अंड्याच्या दरवाढीवर बसला असल्याचे अनिस खानचे म्हणणे आहे.

हेही वाचा - Bharat Jodo Yatra In Kashmir : भारत जोडो यात्रा पोहचली अंतिम टप्यात, यात्रेचा काश्मीर खोऱ्यात प्रवेश

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.