मुंबई - देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता स्थापनेमध्ये असमर्थता दाखवल्यानंतर महाविकास आघाडीची बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. तसेच ठाकरे हेच महाविकास आघाडीचे नेतृत्त्व करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देवेंद्र फडणवीस तत्काळ पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी सरकार बनवण्यात भाजप सक्षम नसल्याचे सांगत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. तसेच जनतेचे स्पष्ट बहुमत भाजपलाच असल्याचा पुनरोच्चार त्यांनी यावेळी केला.अजित पवार यांनी ऐनवेळी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने बहुमताचा दावा करणाऱ्या भाजपला धक्का बसला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका स्पष्ट केली.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांसहीत मित्रपक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीची घोषणा करण्यात आली. मुंबईतील ट्रायडंट हॉटेलात हा कार्यक्रम पार पडला. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी याचा ठराव मांडला. सर्वपक्षीय नेत्यांनी याला अनुमोदन दिले.
Live Update -
03.55 PM - दरवाजे शिवसेनेने बंद केले... आम्ही नाही; फडणवीसांचा सेनेवर आरेप
03.52 PM - अजित पवारांना कोणतीही अट नव्हती; देवेंद्र
03.50 PM - आम्ही सन्मानाने विरोधात बसू; भाजपची नैतिकता अबाधित - फडणवीस
03.47 PM - आमच्यावर घोडेबाजारीचा आरोप करणाऱ्यांनी स्वत मात्र तबेला खरेदी केला; शरद पवारांवर टीका
03.45 PM - आम्ही तत्वाला धरून; शिवसेनेचे हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या चरणाशी
03.42 PM - अम्ही बहुमत सिद्ध करण्यास अपयशी; पत्रकार परिषदेनंतर देणार राजीनामा - देवेंद्र फडणवीस
03.40 PM - तीन चाकं असलेल सरकार चालणार नाही; भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न - मुख्यमंत्री
03.30 PM - जे लोक मातोश्रीतून बाहेर पडत नाहीत ते बाकीच्यांच्या पायऱ्या झिजवत होते - फडणवीस
03.19 PM - उद्धव ठाकरेच 5 वर्षासाठी मुख्यमंत्री - संजय राऊत
03.15 PM - अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. ते महाविकासआघाडीसोबत आहेत. तसचे उद्धव ठाकरेच 5 वर्षांसाठी मुख्यमंत्री होणार - संजय राऊत
02.33 PM - बहुमत चाचणीआधीच महाराष्ट्रात राजकीय भूंकप, अजित पवारांनी दिला उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
02.19 PM - देवेंद्र फडणवीस दुपारी 3.30 वाजता पत्रकार परिषद घेणार
02.19 PM - उद्धव ठाकरे महाविकासआघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याची चर्चा, उद्धव ठाकरेंनी तयारी दर्शवल्याचा शिवसेना नेते दीपक केसरकर यांचा दावा
02.11 PM - कोणी कितीही गोंधळ घातला तरी गटनेता जयंत पाटीलच - जितेंद्र आव्हाड
02.09 PM - महाविकास आघाडीची सायंकाळी 5 वाजता बैठक
01.05 PM - हंगामी अध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरू, वर्षा आणि राजभवनावर हालचाली वाढल्या, राजभवनातून हंगामी अध्यक्षांची निवड होणार
12.52 PM - विधानभवनात कॅमेरे लावण्यास सुरुवात, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व कामकाजाचे लाईव्ह प्रक्षेपण होणार
12.30 PM - बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधीमंडळ गटनेतेपदी निवड
12.24 PM - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर काँग्रेसची महत्त्वाची बैठक सुरू
12.13 PM - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे हॉटेल 'सोफिटेल'मध्ये
12.05 PM - राज्यघटनेतील तत्वे व लोकशाही मूल्यांची जपणूक केल्याबद्दल सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. हा निकाल योगायोगाने संविधानदिवस साजरा होत असताना आल्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान झाला, याचा आनंद आहे - शरद पवार
12.00 PM - महाविकासआघाडीकडून राज्यपालांना दिलेलं 162 आमदारांच्या समर्थनाचं पत्र बोगस - आशिष शेलार
11.43 AM - भाजप कोअर कमिटीच्या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल
11.42 AM - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. काँग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना व मित्रपक्षांची महाआघाडी बहुमत सिद्ध करून महाराष्ट्राला स्थिर सरकार देईल - बाळासाहेब थोरात
11.24 AM - हंगामी अध्यक्षांच्या शर्यतीत एकूण 17 नावं, सचिवालयाने 17 नावांची यादी राज्यपालांकडे पाठवली, यादीत गेल्या 5 टर्मच्या हंगामी अध्यक्षांची नावं, हरिभाऊ बागडेंसाठी भाजपचे प्रयत्न सुरू
11.24 AM - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, उद्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आम्ही तयार आहोत. उद्या आम्ही बहुमत सिद्ध करून दाखवू - चंद्रकांत पाटील
11.24 AM - आम्ही 30 तास काय 30 मिनिटांतही बहुमत सिद्ध करू - संजय राऊत
11.18 AM - सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर 'वर्षा'वर मंत्रिमंडळाची बैठक
11.00 AM - बहुमत चाचणीत भाजप पराभूत होणार, सरकार कोसळणार, त्यामुळे फडणवीसांनी आजच राजीनामा द्यावा - पृथ्वीराज चव्हाण
न्यायालयातील घडामोडी -
- हंगामी अध्यक्ष घेणार बहुमत चाचणी
- उद्या संध्याकाळी 5 वाजता होणार बहुमत चाचणी, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल
- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कोर्टात दाखल, निकाल ऐकण्यासाठी कोर्टात मोठी गर्दी
- पृथ्वीराज चव्हाण सुप्रीम कोर्टात दाखल
- बाळासाहेब थोरात हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे विधानसभा गटनेते
- शिवसेनेचे वकिल कपिल सिब्बल न्यायालयात दाखल
- शिवसेना नेते न्यायालयात दाखल
- न्यायमूर्ती रामना, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांचं खंडपीठ शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय जाहीर करणार
- सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा थोड्याच वेळात निर्णय, फडणवीस सरकारचे ठरणार भवितव्य
हे मांडताहेत यांची बाजू -
- तुषार मेहता - राज्यसरकार
- मुकूल रोहतगी - भाजपचे वकील
- मनिंदर सिंह, अजित पवारांचे वकील
- कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी - महाआघाडी
09.48 AM - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी लोकशाहीची हत्या करत आहेत - संजय राऊत
09.43 AM - राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधीमंडळ गट नेते म्हणून जयंत पाटील यांची निवड, असे पत्र प्राप्त झाले आहे. मात्र, नोंद करून घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहेत - राजेंद्र भागवत, विधीमंडळ सचिव
09.16 AM - अजित पवारच राष्ट्रवादीचे गटनेते - आशिष शेलार
09.07 AM - महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 26/11 च्या 11 व्या वर्धापनदिनानिमित्त वीर जवानांना श्रद्धांजली वाहिली
08.53 AM - ‘वेट अॅण्ड वॉच’, संजय राऊत यांचं सूचक ट्विट
08.10 AM - सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा सकाळी साडे दहाला निर्णय
सोमवारी काय घडलं?
सोमवारी न्यायालयात देवेंद्र फडणवीस यांची बाजू मुकूल रोहतगी तर अजित पवारांच्या वतीने वरिष्ठ अधिवक्ता मनिंदर सिंह यांनी बाजू मांडली. महाविकासआघाडीकडून कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याआधीच 23 नोव्हेंबरला सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपालांच्या आदेशानुसारच हे सरकार स्थापन करण्यात आले, असल्याचा दावा भाजपने केला आहे. तर अजित पवार यांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे, राष्ट्रवादीचा त्यांना कोणत्याही स्वरुपात पाठिंबा नसल्याचे पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी स्पष्ट केले आहे.