मुंबई- शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायक पंडित जसराज यांचे काल वयाच्या ९० व्या वर्षी अमेरिकेत निधन झाले. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्म विभूषण या तिन्ही पद्म पुरस्कारांनी ते सन्मानित झालेले शास्त्रीय गायक होते. त्यांचे पार्थिव आज विशेष विमानाने अमेरिकेतून भारतात आणण्यात आले असून उद्या विलेपार्ले स्मशानभूमीत त्यांच्यावर राजकीय सन्मानासह अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
उद्या सकाळी त्यांच्या अंधेरी पश्चिम येथील निवासस्थानी त्यांचे सर्व संगीत प्रेमी त्यांना अंतिम श्रद्धांजली वाहू शकतील. तिरंग्यात लपेटलेल्या पंडित जसराज यांच्या पार्थिवाचा शेवटचा प्रवास उद्या दुपारी अडीच वाजता सुरू होईल. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता विलेपार्ले स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
हेही वाचा- चिंताजनक..! भारतात 2025 पर्यंत कर्करोगाचे रुग्ण 12 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता