ETV Bharat / state

Devendra Fadnavis on Raigad Landslide: जास्त पाऊस होत असल्याने मदतकार्यात अडथळे-देवेंद्र फडणवीस

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खालापूर नजिक इर्शाळवाडी येथे दरड कोसळ्याची दुर्घटना झाली आहे. जिल्हा प्रशासन स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु आहे. पाऊस सुरू असल्यामुळे बचाव आणि मदत करायला अडथळे येत आहे. मृतांच्या वारसांना सर्वतोपरी मदत राज्य सरकारतर्फे केली जाईल, तसेच जखमींचा उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तसेच आम्ही सारे परिस्थितीवर आणि मदत-बचावकार्यावर सातत्याने लक्ष ठेवून असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Jul 20, 2023, 12:19 PM IST

Updated : Jul 20, 2023, 12:51 PM IST

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

मुंबई : रायगड जिल्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून दुर्घटना घडली. तेथे 48 घरे आहेत. मोठा जास्त झाल्यामुळे ही घटना घडली आहे. 1 तास पायी चालत जावून घटनास्थळी पोहचावे लागत होते.ब चावकार्य सोपे नव्हते. पण एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम तिकडे पोहोचल्या आहेत. आताही मदतकार्य सुरू आहे. जास्त पाऊस होत असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. स्वतः मुख्यमंत्री पूर्ण बचवकार्याचा आढावा घेत आहेत.

दुर्घटनेत झाला अनेकजणांचा मृत्यु : आतापर्यंत 10 जणांचा मृत्य झाल्याची माहिती मिळाली आहे. मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढले जात आहे. त्यांना मातीच्या ढिगाऱ्याखालुन बाहेर काढल्यानंतर त्याची तपासणी केली जात आहे. कुटूंबियांशी त्यांची ओळख पटवली जात आहे. सव्वा दोनशे लोक वस्तीचे गाव आहे. तेथील परिस्थितीबाबत मंत्री गिरीश महाजन आणि स्थानिक आमदार यांच्याशी वारंवार संपर्कात आहे. आतापर्यंत 80 जणांची ओळख पटली आहे.

भूस्खलनाचे स्पॉट बदलत आहेत : भूस्खलनाचे स्पॉट बदलत आहे. गतवर्षी तपासणी करून माहिती घेतलेल्या भुस्कलनाच्या स्पॉटवर दरड कोसळत नाही, तर दुसरीकडे कोसळत आहे. ज्या ठिकाणी भूस्खलनाचे स्पॉट आहेत. त्या ठिकाणी योग्य उपाय योजना आहेत. सगळीकडे अलर्ट देण्यात आले आहेत. राज्यभरात आपल्याला अनेक घटना पाहायला मिळत आहेत. सर्वांना मदत केली जाईल, पैशाची कोणतीही अडचण नसल्याचे फडवणीस यांनी म्हटले आहे. या घटनेतील लोकांना योग्य मदत दिली जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.

मुख्यमंत्री घटनास्थळी : मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी दुर्घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याची पाहणी केली, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच मंत्रालयात जावून आपत्कालिन नियंत्रण कक्षाची सूत्रे स्विकारत, बचाव व मदतकार्याचे नियंत्रण केले. उपमुख्यमंत्री अजित पवार नियंत्रण कक्षातून दुर्घटनास्थळावर उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना बचाव, मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरसह या यंत्रणा तात्काळ उपलब्ध करुन देण्याची कार्यवाही पूर्ण केली. या घटनेची माहिती मिळताच बुधवारी दोन पथके घटनास्थळी पोहोचली होती. त्या ठिकाणी तर ऑपरेशनमध्ये सहभागी होण्यासाठी मुंबईहून आणखी दोन पथके रवाना झाली होती, अशी माहिती एनडीआरएफने दिली.

हेही वाचा :

  1. Raigad Landslide: इर्शाळवाडीत दरड कोसळल्यानंतर मुख्यमंत्री थेट घटनास्थळी, मृताच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
  2. Khalapur Irshalgad Landslide : रायगडमधील इर्शाळवाडीत दरड कोसळली, 10 जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत जाहीर
  3. Raigad landslide : रायगडमधील इर्शाळवाडीत दरड कोसळल्याने अनेकजण मलब्याखाली अडकले, घटनास्थळी मदतकार्य सुरू, पहा फोटो

Last Updated : Jul 20, 2023, 12:51 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.