ETV Bharat / state

दाऊद इब्राहिमचा मृत्यू झाला तर मुंबईसह आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी जगतावर काय परिणाम होईल? - धनराज वंजारी

Dawood Ibrahim : राज्याचे निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांच्या मते, दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची बातमी विश्वासार्ह असू शकते. जर दाऊदचा मृत्यू झाला तर या घटनेकडे विविध बाजूंनी पाहणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.

Dawood Ibrahim
Dawood Ibrahim
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 18, 2023, 10:24 PM IST

निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी

मुंबई Dawood Ibrahim : मोस्ट वॉन्टेड अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कराचीत विषप्रयोग झाल्याच्या बातमीनं देशात खळबळ उडाली आहे. मात्र या बातमीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. पाकिस्तानी मीडियानं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. या बातमीनंतर काही काळ पाकिस्तानमधील इंटरनेट सेवा बंद होती. त्यामुळे नक्कीच काहीतरी घडलं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या घटनेला दोन बाजूंनी पाहणं गरजेचं : राज्याचे निवृत्त पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनी याबाबत बोलताना अधिक माहिती दिली. दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाल्याची बातमी विश्वासार्ह असू शकते, असं त्यांचं मत आहे. जर दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, तर या घटनेला दोन बाजूंनी पाहणं गरजेचं आहे, असं ते म्हणाले. "पहिली बाजू म्हणजे, दाऊदच्या मृत्यूनंतर भारताशी संबंधित आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळ्यांवर याचा काय परिणाम होईल. तर दुसरी बाजू म्हणजे, दाऊदची जेवढी संपत्ती भारतात आहे, त्या संपत्तीचं पुढे काय होणार? यावर येत्या काळात राजकारण देखील होऊ शकतं", असं वंजारी म्हणाले.

दाऊदचं मरण कोणासाठी फायदेशीर : वंजारी पुढे बोलताना म्हणाले की, "दाऊदवर जर विषप्रयोग झाला असेल तर तो कोणी केला? कारण दाऊद हा आयएसआय या पाकिस्तानी गुप्तहेर एजन्सीच्या संरक्षणाखाली होता. सीआयए या अमेरिकन एजन्सीची देखील त्याला मदत होती. मात्र कधी-कधी या एजन्सी स्वतःहून अशा लोकांना संपवतात", असं त्यांनी सांगितलं. वंजारी पुढे बोलताना म्हणाले की, "यामध्ये आणखी एक बाजू विचारात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे यामागे एखाद्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगार टोळीचा हात आहे का? यासाठी, दाऊदचं मरण कोणासाठी फायदेशीर आहे हे बघावं लागेल", असं त्यांनी सांगितलं.

दाऊदच्या संपत्तीचं पुढे काय होणार : धनराज वंजारी पुढे बोलताना म्हणाले की, या घटनेची दुसरी बाजू म्हणजे, दाऊदच्या संपत्तीचं पुढे काय होणार? यावर राजकारण होण्याचीही शक्यता असल्याचंं ते म्हणाले. मध्यंतरी, दाऊदचा सहकारी इकबाल मिर्चीच्या संपत्तीच्या खरेदीत राज्यातील काही मंत्र्यांची नावं आली होती. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना, दाऊदशी संबंध असल्याच्या आरोपांवरून तुरुंगाची हवा खावी लागली होती. यामुळे दाऊदच्या मृत्यूच्या घटनेला आपल्याला या बाजूनंही पाहणं गरजेचं असल्याचं मत धनंजय वंजारी यांनी व्यक्त केलं.

हे वाचलंत का :

  1. करोडोंच्या संपत्तीचा मालक दाऊद, मात्र आई-वडिलांच्या अंत्ययात्रेला नाही हजर राहू शकला
  2. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे राज्यातील अनेक नेत्यांशी कथित संबंध? राजकीय आरोपांनी प्रतिमा मलिन करण्याचे प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.