ETV Bharat / state

कर्जमाफी योजनेअंतर्गत एकरकमी परतफेडीसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ - सहकारमंत्री

योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, जेणेकरुन त्यांना चालू खरीप हंगामामध्ये पीककर्ज घेणे सुकर होईल, असे आवाहन सहकारी मंत्री देशमुख यांनी केले.

सुभाष देशमुख
author img

By

Published : Jul 17, 2019, 10:29 AM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे. यात एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरावी लागणार आहे. त्यासाठी ३१ ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

'एक रक्कम परतफेड घटकामध्ये' ज्या पात्र लाभार्थ्यांची योजनेमध्ये मंजूर केलेली रक्कम १.५० लाखाच्या वर आहे, अशा शेतकऱ्यांना १.५० लाखावरील त्यांच्या हिश्श्याची रक्कम भरल्यानंतर योजनेअंतर्गत १.५० लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्ज माफी देण्यात येते. सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, जेणेकरुन त्यांना चालू खरीप हंगामामध्ये पीककर्ज घेणे सुकर होईल, असे आवाहन सहकारी मंत्री देशमुख यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये सद्यस्थितीत सुमारे ५० लाख खातेदारांना २४ हजार ३१० कोटी रक्कम मंजूर करण्यात आली आहेत. आतापर्यंत सुमारे ४४ लाख खातेदारांना १८ हजार ५०० कोटीचा लाभ देण्यात आला आहे, असेही देशमुख यांनी सांगितले.

Intro:Body:mh_mum_04__loan_waver_extension_vis_7204684

कर्जमाफी योजनेअंतर्गत एकरकमी परतफेडीसाठी 

31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ

- सुभाष देशमुख

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे कर्जमाफीची प्रक्रिया सुरू आहे.

यात एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या हिस्साची रक्कम भरण्यासाठी ३१ ऑक्टोबर, २०१९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.  अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

“एक रक्कम परतफेड घटकामध्ये” ज्या पात्र लाभार्थ्यांची योजनेमध्ये मंजूर केलेली रक्कम रु. १.५० लाखाच्या वर आहे,अशा शेतकऱ्यांना रुपये १.५० लाखावरील त्यांच्या हिस्याची रक्कम  भरल्यानंतर योजनेअंतर्गत रुपये १.५० लाखाच्या मर्यादेपर्यंत कर्ज माफी देण्यात येते.

सदर योजनेचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा जेणेकरुन त्यांना चालू खरीफ हंगामामध्ये पीककर्ज घेणे सुकर  होईल असे आवाहन सहकारी मंत्री श्री. देशमुख यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेमध्ये सद्यस्थितीत सुमारे 50 लाख खातेदारांना रुपये 24310 कोटी  रक्कम मंजूर करण्यात आली आहेत.आतापर्यत सुमारे ४४ लाख खातेदारांना रु.१८५०० कोटीचा लाभ देण्यात आला  आहे असेही देशमुख यांनी सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.