ETV Bharat / state

Dapoli Sai Resort Case : माजी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका; फेटाळला जामीन अर्ज - जयराम देशपांडे यांचा जामीन अर्ज फेटाळला

Dapoli Sai Resort Case : ठाकरे गटाचे आमदार तथा माजी मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी माजी जिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांच्यावर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीएमएलए न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी जयराम देशपांडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

Dapoli Sai Resort Case
जयराम देशपांडे यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयानं फेटाळला
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 27, 2023, 7:45 AM IST

मुंबई Dapoli Sai Resort Case : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात माजी जिल्हाधिकारी जयराम देशपांडे यांना सत्र न्यायालयानं मोठा दणका दिलाय. न्यायमूर्ती एम. जी. देशपांडे यांनी (26 ऑक्टोबर) सुनावणी पूर्ण झाल्यानंतर जयराम देशपांडे यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळं जयराम देशपांडे यांचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे.

...त्यामुळं जामीन अर्ज फेटाळला : मुंबईच्या पीएमएलए न्यायालयात गुरुवारी न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांच्यासमोर सुनावणी झाली. साई रिसॉर्ट बांधकाम करण्यासाठी शेतजमिनीचं रूपांतर बिगर कृषी जमिनीत करण्याबाबत मंजुरी दिली गेली होती. ते दर्शविणारे स्पष्ट पुरावे जयराम देशपांडे यांच्या विरोधात आहेत. म्हणून त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत असल्याचं न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी स्पष्ट केलंय.

जयराम देशपांडेंच्या वकिलांनी मांडली बाजू : जयराम देशपांडे यांच्या बाजूनं वकिलांनी युक्तिवाद केला. ते म्हणाले की, जयराम देशपांडे यांना जामीन मिळायला हवा. कारण आतापर्यंतच्या सर्व प्रकारच्या चौकशी आणि तपासामध्ये त्यांनी सहकार्य केले. एखाद्या आरोपा संदर्भात आरोपी तपास यंत्रणांच्या तपासामध्ये सहकार्य करतो, त्यानंतर त्याच्या जामीन अर्जावर न्यायालय विचार करतं. त्यामुळं तपासात सहकार्य करत असल्यामुळं जयराम देशपांडे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयानं विचार करावा, असं वकिलांनी म्हणाले. मात्र पीएमएलए न्यायालयानं उपलब्ध तथ्य आणि पुरावे पाहता जामीन अर्ज फेटाळून लावला.

नेमकं काय आहे प्रकरण : माजी मंत्री अनिल परब यांच्या दापोली येथील साई रिसॉर्टचे बांधकाम बेकायदेशीर असल्याचा आरोप केला गेला. तसंच यासंदर्भात पर्यावरण खात्याचे नियमदेखील डावलण्यात आल्याची तक्रार 2022 साली दाखल झाली. यानंतर अंमलबजावणी संचलनालयानं माजी मंत्री परब यांच्याशी संबंधित सदानंद कदम आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी जयराम विनायक देशपांडे यांना पोलीस कोठडी दिली होती. अनिल परबांचे निकटवर्तीय असलेल्या सदानंद कदम यांनी साई हॉटेल बांधकाम प्रकरणी भूमिका निभावली होती. तसंच आर्थिक देवाणघेवाणही केल्याचा आरोप आहे. त्यासंदर्भात ऑनलाईन आर्थिक व्यवहार झाल्याच्या ईडीने आरोप केला. सदानंद कदम यांनी अनिल परब यांना मदत केली, तसंच माजी उपजिल्हाधिकारी जयराम विनायक देशपांडे यांनी देखील नियमबाह्य पद्धतीने बेकायदेशीर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणांमध्ये माजी मंत्री अनिल परब यांना मदत केल्याचा ईडीनं आरोप केला.

हेही वाचा -

  1. Sai Resort Case : साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्याविरोधातली याचिका मागे, किरीट सोमय्या यांचा निर्णय
  2. Anil Parab : 24 ऑगस्टपर्यंत अनिल परब यांच्यावर कठोर कारवाई न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
  3. Dapoli Sai Resort Case : माजी उपजिल्हाधिकारी जयराम देशपांडेंसह सदानंद कदमांचा तुरुंगातील मुक्काम वाढला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.