मुंबई : राज्यात महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न चिघळला (Maharashtra Karnataka border issues ) असून यावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने उच्च अधिकार समिती नेमली. या समितीमधील मंत्री कर्नाटक राज्याच्या दौऱ्यावर उद्या जाणार होते. कर्नाटकातून राज्यातील मंत्र्यांनी येऊ नये, असा इशारा देण्यात आला. मंत्री चंद्रकांत पाटील ( Minister Chandrakant Patil ) आणि शंभूराज देसाई ( Shambhuraj Desai ) यांनी हा दौरा रद्द केला.
सोलापूरात कर्नाटक भवन करायचा घोषित : विरोधकांनी यावरून टीकेची झोड उठवली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी यावरूनही हल्लाबोल केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री जत तालुक्यामध्ये उघडपणे शेतकऱ्यांना पाणी सोडतात, सोलापूरात कर्नाटक भवन करायचा घोषित करतात.
अक्कलकोट आणि सोलापूर तिथे कानडी बांधव जास्ती तेव्हा ते आमचे म्हणतात. असे असताना महाराष्ट्राच्या सरकारने सुद्धा तेवढेच आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. बेळगावला जाण्याचा दौरा देखील रद्द केला. याचा अर्थ हे मंत्री सुद्धा शेपूट घालतात, अशी टीका दानवे यांनी केली.
कायदे तज्ञांशी चर्चा : कर्नाटकच्या निवडणुका जवळ आल्याने भारतीय जनता पार्टी अशी विधाने करत असल्याचा आरोप केला. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री दिल्लीत कायदे तज्ञांशी चर्चा करतात, अधिकाऱ्यांना भेटतात, पदाधिकाऱ्यांना भेटतात. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातले लोक सारखा शेपूट घालून गुपचूप बसत असल्याचे दानवे म्हणाले. अलाहाबाद न्यायालयाच्या निकालावर, शिवसेना ठाकरे गट आणि वंचितच्या युतीवरही त्यानी भाष्य केले.