मुंबई - राज्य शासनाकडून गर्दी करू नका म्हणून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. अशाच प्रकारचे आवाहन मध्य रेल्वेकडून सुद्धा प्रवाशांना करण्यात आले आहे. मंगळवारी मध्य रेल्वेकडून लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस गाड्या काही प्रमाणात रद्द करण्यात आल्या आहेत. या बरोबरच मध्य रेल्वेच्या मार्गांवरील रेल्वे फलाटांवर तिकिटांचे दर सुद्धा वाढविण्यात आलेले आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोकल रेल्वे प्रवाशांना मार्गदर्शन करणारे फलक स्थानकांवर लावण्यात आलेले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून प्रत्येक लोकलच्या रेकची स्वच्छता केली जात असल्याची माहिती मध्य रेल्वेचे प्रमुख जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे. त्यांच्याशी या संदर्भात अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी...
मध्य रेल्वेवर दररोज 46 लाख प्रवाशांची ये-जा होत असते, मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव पाहतात मध्य रेल्वेकडून लोकल प्रवाशांना आवाहन करण्यात आले होते की, गरज असेल तरच प्रवास करा. या आवाहनानंतर मध्य रेल्वेच्या प्रवासी संख्येमध्ये घट झाली असून बुधवारी जवळपास 41 लाख प्रवाशांनी प्रवास केल्याचे मध्य रेल्वेचे म्हणणे आहे.
हेही वाचा - CORONA : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर प्रवाशांची तुरळक गर्दी