मुंबई - कोरोना व्हायरसचे संक्रमण संपूर्ण राज्यात वाढत असून यावर उपाय म्हणून राज्यात 22 मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना व्हायसरच्या बाबतीत जातीय तेढ निर्माण करून सोशल माध्यमांवर अफवा पसरविण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे, अशा व्यक्तींच्या विरोधात राज्य सायबर विभाग कारवाई करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्य सायबर विभागाने 301 जणांवर कारवाई केली आहे.
राज्यात सर्वाधिक गुन्हे हे बीड जिल्ह्यात २८ नोंदविले गेले असून, पुणे ग्रामीण २४, मुंबई २०, कोल्हापूर १६, जळगाव १४, सांगली १२, नाशिक शहर ११, जालना ११, नाशिक ग्रामीण १०, बुलढाणा १०, लातूर ९, सातारा ९, नांदेड ९, ठाणे शहर ८,परभणी ७, सिंधुदुर्ग ७, नवी मुंबई ७, ठाणे ग्रामीण ६, हिंगोली ६, नागपूर शहर ६, पालघर ६, गोंदिया ५, सोलापूर ग्रामीण ५, अमरावती ४, पुणे शहर ४, रत्नागिरी ४, सोलापूर शहर ४, भंडारा ३, चंद्रपूर ३, रायगड २, धुळे २, वाशिम २, पिंपरी- चिंचवड १, औरंगाबाद १ असा समावेश आहे.
सर्वाधिक सायबर गुन्हे हे व्हॉट्सअॅप सारख्या माध्यमांवर घडत असून आक्षेपार्ह व्हाट्सअॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्याप्रकरणी १२४ गुन्हे तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी ११२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. टिक टॉक सारख्या सोशल माध्यमांवर व्हिडिओ शेअर केल्या प्रकरणी ९ गुन्हे व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ३ गुन्हे दाखल झाले आहेत. ऑडिओ क्लिप्स, व युट्युब चा गैरवापर केल्या प्रकरणी ४८ गुन्हे दाखल झाले असून आतापर्यंत १०० आरोपींना अटक केली आहे .
लातूर व ठाण्यात व्हॉट्सअॅप व फेसबुकवर अफवा पसरविण्याचा प्रयत्न ....
लातूर जिल्ह्यातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे कोरोना महामारीबद्दल चुकीची माहिती देणारी पोस्ट टाकून शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण व अफवा पसरवली होती. यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.
ठाणे शहरांतर्गत खडकपाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात अज्ञात व्यक्तीने पीडित तक्रारदाराच्या मुलास कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यास रुग्णालयात घेऊन गेले आहेत. मुलाच्या भावांना देखील लागण झाली आहे. त्यामुळे कोणीही फिर्यादीच्या दुकानातून मटण खरेदी करू नये, अशा आशयाचे मेसेज व्हाट्सअॅपद्वारे पसरवून अफवा पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
LOCKDOWN : कोरोनाबाबत अफवा.. सायबर विभागाकडून 301 गुन्हे दाखल, 100 आरोपींना अटक
कोरोना व्हायसरच्या बाबतीत जातीय तेढ निर्माण करून सोशल माध्यमांवर अफवा पसरविण्याचा प्रयत्न समाजकंटकांकडून केला जात आहे. अशा व्यक्तींच्या विरोधात राज्य सायबर विभाग कारवाई करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात राज्य सायबर विभागाने 301 जणांवर कारवाई केली आहे. राज्यात सर्वाधिक गुन्हे हे बीड जिल्ह्यात नोंदविले गेले आहेत.