मुंबई - खासगी क्षेत्रातील येस बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यामुळे आरबीआयने येस बँकेवर एका महिन्यासाठी स्थगिती आणली आहे. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यामधून केवळ ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. यामुळे ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
-
Mumbai: RBI imposed moratorium for a month on Yes Bank due to 'serious deterioration in its financial position', capping withdrawals at Rs 50000. Customers say "We weren't informed. Wanted to withdraw cash but ATM run out of cash,as many withdrew. We're in trouble,Holi is coming" pic.twitter.com/aSWcKjA0NK
— ANI (@ANI) March 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai: RBI imposed moratorium for a month on Yes Bank due to 'serious deterioration in its financial position', capping withdrawals at Rs 50000. Customers say "We weren't informed. Wanted to withdraw cash but ATM run out of cash,as many withdrew. We're in trouble,Holi is coming" pic.twitter.com/aSWcKjA0NK
— ANI (@ANI) March 5, 2020Mumbai: RBI imposed moratorium for a month on Yes Bank due to 'serious deterioration in its financial position', capping withdrawals at Rs 50000. Customers say "We weren't informed. Wanted to withdraw cash but ATM run out of cash,as many withdrew. We're in trouble,Holi is coming" pic.twitter.com/aSWcKjA0NK
— ANI (@ANI) March 5, 2020
येस बँक या खासगी क्षेत्रातील बँकेवर कर्जाचा एनपीए वाढल्याने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यातून केवळ ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहेत. याबाबत माहिती मिळताच अनेकांनी एटीएममधून पैसे काढले. यामुळे एटीएममधील रोख संपल्याने अनेक ग्राहकांना पैसे काढता येत नाहीयेत. याबाबत आम्हाला कळविण्यात आले नसल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. होळीच्या सणावर अशाप्रकारे निर्बंध लादल्यामुळे ग्राहक संकटात सापडले असून ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हेही वाचा - 'आरबीआय'ने येस बँकेवर लादले निर्बंध, खात्यातून ५० हजारपर्यंतचीच रक्कम काढता येणार
दरम्यान, येस बँकेच्या खातेदारांना ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास आरबीआयची परवानगी घ्यावी लागणार आहे. वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नसमारंभ या तीन कारणांसाठीच खातेदार आपल्या खात्यातून जादाची रक्कम काढू शकणार आहेत.
हेही वाचा - 'राज्यात कुठेही डिटेन्शन कॅम्प उभारले जात नाहीत'