मुंबई Cricket World Cup 2023 : मुंबई परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी सांगितलं की, वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्यासाठी पोलीस पूर्णपणे सज्ज आहेत. सलग ९ सामन्यांमध्ये अपराजित राहिलेली टीम इंडिया बुधवारी विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी टक्कर घेईल. या सामन्यासाठी मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून १२० पोलीस अधिकारी आणि ६०० पोलीस कर्मचारी वानखेडे स्टेडियम आणि आसपास तैनात करण्यात येणार आहेत. मंगळवारी संध्याकाळी भारतीय टीम वानखेडे स्टेडियमवर दाखल झाली.
-
#WATCH | ICC Cricket World Cup | Indian Cricket team arrives at Mumbai's Wankhede Stadium ahead of the semi-final match against New Zealand to be played tomorrow. pic.twitter.com/bOpWnP1zB9
— ANI (@ANI) November 14, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | ICC Cricket World Cup | Indian Cricket team arrives at Mumbai's Wankhede Stadium ahead of the semi-final match against New Zealand to be played tomorrow. pic.twitter.com/bOpWnP1zB9
— ANI (@ANI) November 14, 2023#WATCH | ICC Cricket World Cup | Indian Cricket team arrives at Mumbai's Wankhede Stadium ahead of the semi-final match against New Zealand to be played tomorrow. pic.twitter.com/bOpWnP1zB9
— ANI (@ANI) November 14, 2023
सुरक्षेच्या उपाययोजना वाढवल्या : पोलीस उपायुक्त प्रवीण मुंढे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना अधिक माहिती दिली. "वानखेडे स्टेडियममध्ये या विश्वचषकाच्या ४ सामन्यांचं यशस्वी आयोजन करण्यात आलंय. आम्ही सुरक्षेच्या बाबतीत चांगली तयारी केली आहे. बुधवारचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे मुंबई पोलीस बंदोबस्त कडेकोट ठेवणार आहेत. या सामन्याचं महत्त्व लक्षात घेऊन आम्ही सुरक्षेच्या उपाययोजना वाढवल्या आहेत", असं त्यांनी सांगितलं.
किरकोळ गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्वतंत्र पथकं : प्रवीण मुंढे पुढे म्हणाले की, अधिकाऱ्यांसोबतच स्ट्रायकिंग फोर्स, दंगल नियंत्रण दल आणि क्विक रिअॅक्शन टीमचीही तैनाती करण्यात आली आहे. ते सुरक्षेसह नागरिकांची काळजी घेण्यासाठी उपलब्ध असतील. याशिवाय, छेडछाड आणि चोरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र पथकं तयार करण्यात आल्याचं मुंढे यांनी सांगितलं. स्टेडियममध्ये आणि आजूबाजूला कोणत्याही बेकायदेशीर फेरीवाल्यांना किंवा कोणत्याही वस्तूंच्या बेकायदेशीर विक्रीला परवानगी दिली जाणार नाही. त्यासाठी पोलिसांची विशेष पथकं तैनात करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
तिकिटांचा काळाबाजार झाला : १२ वर्षांनंतर भारतात आयोजित करण्यात आलेल्या या विश्वचषकात तिकिटांचा काळाबाजार झाल्याचंही उघडकीस आलं आहे. ११ नोव्हेंबरला पोलिसांना माहिती मिळाली होती की, मालाड येथील एकानं भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्याचं तिकीट मूळ किमतीपेक्षा चार ते पाच पटींनी वाढीवून विकलं. या प्रकरणी सर जेजे मार्ग पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : पुन्हा एकदा दिसणार भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य सामन्याचा थरार! टीम इंडिया मँचेस्टरचा बदला मुंबईत घेणार का?
- India vs New Zealand : भारत न्यूझीलंडमध्ये वानखेडेवर उपांत्य फेरीचा सामना; सामान्य मुंबईकरांना तिकीट नाही?
- Hotel Rate In Mumbai : भारत-न्यूझीलंड सामन्यापूर्वी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल्सचे दर गगनाला!