ETV Bharat / state

Covid 19 : कोरोनामुळे मुंबईत एकाचा मृत्यू; कोविडच्या सक्रिय रुग्ण संख्येत वाढ

महाराष्ट्रावर कोरोना विषाणूचे संकट पुन्हा एकदा घोंघावत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. आता कोरोनाचा नवा व्हेरिएंट रुग्णांमध्ये आढळून येत आहे. देशात पहिल्यांदा या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे.

ओमिक्रॉनच्या नवा व्हेरियंटमुळे एकाचा मृत्यू

author img

By

Published : Aug 11, 2023, 3:35 PM IST

मुंबई : कोरोना महामारीच्या विळख्यातून आता कुठे आपण थोडा मोकळा श्वास घेऊ लागलो होतो. तितक्यात कोविड-19ने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोविड-19मुळे एकाचा मृत्यू झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. जुलै महिन्यात कोरोनामुळे मृत्यू झाला होता, त्या मृत्यूची बुधवारी अधिकृत नोंद करण्यात आली आहे. दरम्यान महाराष्ट्रात सर्वाधिक सक्रिय प्रकरणे मुंबईत आहेत. मुंबईत एकूण 43 सक्रिय रुग्ण आहेत. तर पुण्यात 34 आणि ठाण्यात 25 आहेत. रायगड, सांगली, सोलापूर, सातारा आणि पालघर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक सक्रिय रुग्ण आहे. त्यामुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.

14 नवीन कोविड रुग्ण : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती 75 वर्षीय व्यक्ती असून त्याला दीर्घकालीन लिव्हर कार्सिनोमा झाला होता. यात महत्त्वाची बाब म्हणजे या व्यक्तीला कोविड-19 ची लागण झाली होती. परंतु कोरोनाचा संसर्ग होणे हे त्याच्या मृत्यूचे प्राथमिक कारण नव्हते. यामुळे आरोग्य विभागासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे. कारण संपूर्ण जून आणि जुलैमध्ये कोविडमुळे एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. अशात बुधवारी राज्यातून 14 नवीन कोविड रुग्ण आढळून आले आहेत. सध्या सुरू असलेल्या कोरोनाच्या चाचण्यांची संख्या देखील खूप कमी आहे.

ओमिक्रॉनचा उप-प्रकार : अलीकडेच कोविडच्या ओमिक्रॉनचा नवा व्हेरिएंट आढळून आला. या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून त्यामुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. आता याच नव्या व्हेरिएंटचे रुग्ण मुंबईत आढळून आल्याने प्रशासनासह नागरिकांची चिंता वाढली आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, EG.5.1, 'Eris' हा covid चा घातक व्हेरिएंट ओमिक्रॉन चा उप-प्रकार आहे. हा नवा विषाणू यावर्षी मे महिन्यापासून राज्यात सक्रिय झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. मे महिन्यात महाराष्ट्रात ई. जी.5.1चे रुग्ण आढळून आले. त्याचा शोध लागल्यापासून 2 महिने उलटून गेले तरी आणि जून आणि जुलैच्या महिन्यात कोविडच्या रुग्णांमध्ये वाढ झाली नव्हती. शिवाय या सब व्हेरिएंटमध्ये कोणताही परिणाम होताना दिसत नव्हता. मात्र सध्या जे रुग्ण आढळत आहेत त्यांच्यात XBB.1.16 आणि XBB.2.3 या प्रकारचे विषाणू आहेत.

हेही वाचा-

  1. Omicron Sub Variants : ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीतून कसा पडतो बाहेर, जाणून घ्या सविस्तर माहिती
  2. Women Mortality Rising Due To COVID : सावधान! गरोदर महिलांकरिता कोरोना ठरतोय जीवघेणा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.