मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. आज रविवारी १९ सप्टेंबरला ३ हजार ४१३ रुग्ण आढळून आले आहेत. ४९ रुग्णांचा मृत्यू झाला असून ८ हजार ३२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज आढळून आलेल्या रुग्णांच्या दुप्पट रुग्ण हे बरे होऊन घरी गेले आहेत.
राज्यात ४२ हजार ९५५ सक्रिय रुग्ण -
राज्यात आज दिवसभरात ८ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ६३ लाख ३६ हजार ८८७ झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१६ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ३ हजार ४१३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ४९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १ लाख ३८ हजार ५१८ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ७० लाख २८ हजार ४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५ लाख २१ हजार ९१५ (११.४४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ८९ हजार ५६१ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात साध्य ४२ हजार ९५५ सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्णसंख्येत चढउतार -
२६ ऑगस्टला ५ हजार १०८, ३० ऑगस्टला ३ हजार ७४१, ३१ ऑगस्टला ४ हजार १९६, १ सप्टेंबरला ४ हजार ४५६, २ सप्टेंबरला ४ हजार ३४२, ३ सप्टेंबरला ४ हजार ३१३, ४ सप्टेंबरला ४ हजार १३०, ५ सप्टेंबरला ४ हजार ०५७, ६ सप्टेंबरला ३ हजार ६२६, ७ सप्टेंबरला ३ हजार ९८८, ८ सप्टेंबरला ४ हजार १७४, ९ सप्टेंबरला ४ हजार २१९, १० सप्टेंबरला ४ हजार १५४, ११ सप्टेंबरला ३ हजार ०७५, १२ सप्टेंबरला ३ हजार ६२३, १३ सप्टेंबरला २ हजार ७४०, १४ सप्टेंबरला ३ हजार ५३०, १५ सप्टेंबरला ३ हजार ७८३, १६ नोव्हेंबरला ३ हजार ५९५, १७ सप्टेंबरला ३ हजार ५८६, १८ सप्टेंबरला ३ हजार ३९१, १९ सप्टेंबरला ३ हजार ४१३ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरात रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे.
मृत्यूदर २.१२ टक्के -
१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, ९ ऑगस्टला ६८, १२ ऑगस्टला २०८, २५ ऑगस्टला २१६, ३० ऑगस्टला ५२, ३१ ऑगस्टला १०४, १ सप्टेंबरला १८३, २ सप्टेंबरला ५५, ३ सप्टेंबरला ९२, ४ सप्टेंबरला ६४, ५ सप्टेंबरला ६७, ६ सप्टेंबरला ३७, ७ सप्टेंबरला ८६, ८ सप्टेंबरला ६५, ९ सप्टेंबरला ५५, १० सप्टेंबरला ४४, ११ सप्टेंबरला ३५, १२ सप्टेंबरला ४६, १३ सप्टेंबरला २७, १४ सप्टेंबआ ५२, १५ सप्टेंबरला ५६, १६ नोव्हेंबरला ४५, १७ सप्टेंबरला ६७, १८ सप्टेंबरला ८०, १९ सप्टेंबरला ४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात २.१२ टक्के इतका मृत्यु दर नोंदवण्यात आला आहे.
या विभागात सर्वाधिक रुग्ण
मुंबई - ४२३
अहमदनगर - ५९२
पुणे - ४२५
पुणे पालिका - १८६
पिपरी चिंचवड पालिका - १२३
सोलापूर - २३९
सातारा - २५२
सांगली - १४३
हेही वाचा - दहशतवादी कारवाई प्रकरण : मुंब्रातून आणखी एकास अटक
हेही वाचा - किरीट सोमैयांना निवासस्थानी स्थानबद्ध, घराभोवती पोलिसांचा बंदोबस्त तैनात