ETV Bharat / state

मुख्यमंत्र्यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या एच पूर्वमध्ये कोरोना नियंत्रणात; मंगळवारी वाढले 19 रुग्ण - कोरोना केसेस इन मुंबई

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या एच पूर्व विभागात कोरोना विषाणूचा प्रसार नियंत्रणात आला आहे. या विभागात मंगळवारी 19 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत तर रुग्ण दुपटीचा वेग 52 दिवसांवर गेला आहे.

corona cases control in matoshri
मातोश्री परिसरात कोरोना नियंत्रणात
author img

By

Published : Jun 17, 2020, 4:06 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवास ज्या विभागात आहे, त्या एच पूर्व विभागातील कोरोना नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. कारण मंगळवारी वांद्रे पूर्व ते सांताक्रूझ या परिसरात केवळ 19 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत. या भागातील रुग्ण दुपटीचा वेग 52 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे या विभागातील नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब ठरली आहे.

एप्रिलमध्ये मातोश्री निवासस्थानालगतच्या एका चहावाल्याला कोरोना झाला. याच चहावाल्याकडे मातोश्रीवर बंदोबस्तासाठी असलेले पोलीस चहा पिण्यासाठी जात होते, त्यामुळे खळबळ उडाली होती. हा परिसर सील करत अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत कलानगर परिसरात एकही रूग्ण आढळलेला नाही. तर एच पूर्व विभागातील कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या बेहरामपाडा, भारतनगर, ज्ञानेश्वरनगर या परिसरातही कोरोना नियंत्रणात आल्याची माहिती एच पूर्वचे वार्ड ऑफिसर ए. जी. खैरनार यांनी दिली आहे.

महिन्याभरापूर्वी या विभागात 80 ते 90 च्या दरम्यान रुग्ण एका दिवसाला आढळायचे.आता मात्र हा आकडा कमी होऊन 25 ते 30 वर आला आहे. मंगळवारी येथे रुग्णवाढीत चांगलीच घट पाहायला मिळाली. केवळ 19 रूग्ण आढळल्याने ही समाधानाची बाब मानली जात आहे. रुग्ण दुपटीचा दर ही 52 दिवसांवर आला आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून झोपडपट्ट्यांमध्ये डोअर टू डोअर स्क्रिनिंग करण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांची तापणसी करणे सुरु आहे. कोरोना रुग्ण आढळल्याबरोबर संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन केले जात आहे. त्यामुळेच या विभागात कोरोना नियंत्रणात येत असून आता आमचे लक्ष्य कोरोनामुक्तीचे आहे, असेही खैरनार यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.