ETV Bharat / state

कोरोना उठला जीवावर.. पालांवर आयुष्य काढणाऱ्यांवर उपासमारीची वेळ - उपासमारीची वेळ

कोरोना व त्यामुळे देशात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीने राज्यातील शेकडो भटक्या व विमुक्ती जाती-जमातींच्या लोकांवर उपासमारीची वेळ ओढवली आहे. अनेक ठिकाणी पोलीस व स्थानिकांकडून मदत मिळत असली तरी काही ठिकाणी अन्नाचा कणही त्यांच्या नशिबी न आल्याने त्यांनी मदतीसाठी टाहो फोडला आहे.

corona virus cerfew sc st comunity people had no food
कोरोनामुळे भटक्या-विमुक्ती जाती जमातींवर उपासमारीची वेळ
author img

By

Published : Mar 28, 2020, 6:20 PM IST

मुंबई - भटकंती करत पालांमध्ये आपले आयुष्य जगणाऱ्या राज्यातील शेकडो भटक्या व विमुक्ती जाती-जमातींच्या लोकांवर कोरोना आणि संचारबंदीने उपासमारीची वेळ ओढवली आहे. अनेक ठिकाणी गावकऱ्यांसोबतच पोलीसही मदत करत असले तरी काही ठिकाणी अन्नाचा कणही त्यांच्या नशिबी न आल्याने त्यांनी मदतीसाठी टाहो फोडला आहे. यामुळेच राज्यातील विविध जिल्ह्यात पालांवर असलेल्या नाथपंथी डवरीगोसावी, नाथगोसावी, वैदू, कुडमुडे जोशी, फासेपारधी, कडकलक्ष्मी, नंदीबैलवाले आदींनी मदतीची हाक दिली आहे.

डवरी गोसावी समाजातील जामखेड, वेळापूर, सांगलो व पंढरपूर या ठिकाणचे तब्बल ३५ बिऱ्हाडं लोणंद येथील इंदिरा नगर, फलटण रोड, (ता. खंडाळा, जिल्हा सातारा) येथे पालावर अडकलेले असून त्यांना आत्तापर्यंत कोणत्याही प्रकारची मदत न मिळाल्याने अनेकांवर उपासमारी ओढवली असल्याची माहिती या ठिकाणी असलेल्या अखिल भारतीय नाथपंथी समाज महासंघाचे भरतकुमार तांबिले यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील गाव कुसूरमधील अनेक भटकेविमुक्त हे हुन्नर या गावी जामखिंडी तालुका बागलकोट जिल्ह्यात अडकून पडले असून त्यांना अजूनही कोणती मदत मिळाली नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. संचारबंदीमुळे आम्ही गावीही निघू शकत नसल्याने आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे सुभाष शिंदे यांनी सांगितले. अशी अवस्था ही गाव वडगाव तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथील भटक्या विमुक्तांची झाली आहे, ते नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुका मध्ये स्वास्तिक पेट्रोल पंपाजवळ समाजबांधव अडकुन पडले असून त्यांनाही कोणती मदत मिळालेली नाही.

कोरोनामुळे भटक्या-विमुक्ती जाती जमातींवर उपासमारीची वेळ
पोलीसही आले मदतीला धावून....तर दुसरीकडे याच जिल्ह्यातील महमदाबाद (ता. मंगळवेढा) अनेक कुटुंब हे खानापूर फाटा तालुका देगलूर जिल्हा नांदेड येथे अनेक दिवसांपासून उपाशी होते, त्यांना नुकतीच स्थानिक पोलीसांनी मदतीचा हात पुढे केल्याची माहिती जालिंदर बाबर यांनी दिली.
corona virus cerfew sc st comunity people had no food
कोरोनामुळे भटक्या-विमुक्ती जाती जमातींवर उपासमारीची वेळ

सांगोला व मोहळ तालुकातील पालांवर जगणारे अनेक कुटुंब हे संचारबंदी लागू होण्यापूर्वीपासून आपल्या गावाकडे निघाले मात्र मध्येच ते कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यात पेट्रोल पंपाजवळ अडकले आहेत. त्यांना काही गावकऱ्यांनी आपली माणुसकी दाखवत किमान काही दिवस उपासमार होणार नाही अशी व्यवस्था केली आहे.

गुजरातमध्येही अडकले राज्यातील भटके-विमुक्त...

विदर्भातील अकोला जिल्ह्यातील शेकडो भटके-विमुक्त हे गुजरात राज्यात सुरत येथील मढी गाव नजीक सोमुर या गावी रेल्वे स्टेशन नजीक आपल्या पालावर अडकले आहेत. सध्यातरी त्यांना स्थानिकांनी मदतीचा हात दिला असला तरी त्यांना आपल्या गावी येण्याची सोय नसल्याने मोठी अडचण झाली असल्याची माहिती योगेश चव्हाण यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.