ETV Bharat / state

लसीचा साठा आला; मुंबईत लसीकरण पुन्हा सुरू - मुंबई पालिका बातमी

लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण वारंवार बंद करावे लागत आहे. आजही लसीचा पुरेसा साठा नसल्याने १३६ पैकी फक्त ३३ खासगी केंद्रांवर लसीकरणाला करण्यात येत होते.

लसीकरण
लसीकरण
author img

By

Published : Apr 29, 2021, 1:03 PM IST

मुंबई - मुंबईत १६ मार्चपासून कोरोना लसीकरण सुरू करण्यात आले आहे. लसीकरणाला मोठ्याप्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. मात्र कित्येक वेळा लसीचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण बंद करावे लागत आहे. आजही लसीचा पुरेसा साठा नसल्याने १३६ पैकी फक्त ३३ खासगी केंद्रांवर लसीकरणाला करण्यात येत होते. मात्र पालिकेकडे लसीचा साठा आल्याने पुन्हा सर्व लसीकरण केंद्र आज दुपारपर्यंत पुन्हा सुरू केली जातील अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लसीकरण मोहीम -

बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात कोविड-१९ प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे ६३ लसीकरण केंद्रे तर खासगी रुग्णालयात ७३ अशी एकूण १३६ लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहेत. मात्र, कोविड प्रतिबंध लसीचा साठा मर्यादित स्वरुपात प्राप्त होत असल्याने अधूनमधून काही केंद्रांवर लसीकरण तात्पुरते थांबवावे लागत आहे. त्यातही दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य देणे क्रमप्राप्त असल्याने लसींचा प्राप्त होणारा साठा लक्षात घेवून दररोज लसीकरण मोहिमेचे नियोजन केले जात आहे. मुंबईतील लसीकरण मोहीम अखंडितपणे सुरु ठेवता यावी, त्यासाठी आवश्यक लस साठा उपलब्ध व्हावा, याकरीता महानगरपालिका प्रशासन केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.

दुपारपर्यंत लसीकरण सुरू -

बृहन्मुंबई महानगरपालिकेला दिनांक २५ एप्रिल २०२१ पर्यंत एकूण २४ लाख ५८ हजार ६०० इतक्या लसी उपलब्ध झाल्या. पैकी, २४ लाख १० हजार ८६० लस उपयोगात आल्या. म्हणजेच ४७ हजार ७४० इतका लससाठा आज लसीकरणानंतर केंद्रावर शिल्लक होता. मुंबईमध्ये १३६ लसीकरण केंद्र आहेत. त्यात ७३ खासगी लसीकरण केंद्र आहेत. या खासगी लसीकरण केंद्रांपैकी ३३ केंद्र आज सुरू ठेवण्यात आली. मात्र लसीचा साठा आल्याने इतर लसीकरण केंद्र दुपारपर्यंत सुरू केली जातील, लसीचा हवा तसा साठा येत नसल्याने जो साठा आला तितके दिवस लसीकरण सुरू राहू शकते, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.