ETV Bharat / state

दादर, माहीम, धारावीतील पेट्रोल पंप, ज्वेलरी कर्मचाऱ्यांच्या होणार कोरोना चाचण्या - Dharavi employee corona test

दादर, माहीम आणि धारावीत पेट्रोलपंप, बेकरी, ज्वेलरी, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजपासून विशेष कोरोना चाचणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ही मोहीम २९ डिसेंबरपर्यंत सुरू राहाणार असून, एकूण ५ ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

Corona Update
प्रतिकात्मक
author img

By

Published : Dec 24, 2020, 10:14 PM IST

Updated : Dec 24, 2020, 10:30 PM IST

मुंबई - मुंबईत मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला आहे. दिवाळीत झालेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर, दुकानदार आणि फेरीवाल्यांसाठी महापालिकेने विशेष कोरोना चाचणी शिबिरे आयोजित केली होती. त्यानंतर आता दादर, माहीम आणि धारावीत पेट्रोलपंप, बेकरी, ज्वेलरी, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजपासून विशेष कोरोना चाचणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. ही मोहीम २९ डिसेंबरपर्यंत सुरू राहाणार असून, एकूण ५ ठिकाणी शिबिरे घेण्यात येणार आहेत.

हेही वाचा - मराठा समाजाला EWS आरक्षण; संघटनांमधून मात्र नाराजीचा सूर

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 'चेज द व्हायरस', 'मिशन झिरो' तर राज्य सरकारने 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' ही मोहीम राबवत कोरोनावर नियंत्रण मिळवले. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीचा भाग असलेल्या धारावीसह दादर, माहीममधील कोरोना रुग्णांची संख्या आता कमी होत आहे. मात्र, तरीही कोरोनाचा एकही संशयित रुग्ण राहू नये यासाठी पालिका प्रयत्नशील असून त्याचाच एक भाग म्हणून आता लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या पेट्रोलपंप, बेकरी, ज्वेलरी बनवणारे आणि डिपार्टमेंटल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्याने दिली.

मेट्रो कामगारांच्याही चाचण्या -

जी/उत्तरमध्ये येणाऱ्या दादर, माहीममध्ये मेट्रो -३ चे काम सुरू असून तिथे काम करणारे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. म्हणून मुंबईच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून २६ डिसेंबरला शितलादेवी मंदिरासमोर मेट्रो कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यासाठी एका विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनासाठी अँटिजेन आणि आरटी-पीसीआर या चाचण्या केल्या जाणार आहेत.

धारावीत केवळ १६ सक्रिय रुग्ण -

धारावीत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असून आज कोरोनाचे केवळ ३ रुग्ण सापडले. धारावीत आता केवळ १६ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर विविध कोरोना सेंटर्समध्ये उपचार सुरू आहेत. धारावीत ३ हजार ७८८ रुग्ण सापडले असून आतापर्यंत ३ हजार ४६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

हेही वाचा - गर्दी न करता साधेपणाने ख्रिसमस साजरा करा; नाताळनिमित्त राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Last Updated : Dec 24, 2020, 10:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.