ETV Bharat / state

कर्नाटक सीमेवर तपासणी तर मध्यप्रदेश सीमेवर कोरोनाचे नियम पायदळी; पाहा रियालिटी चेक - महाराष्ट्र गुजरात सीमा बातमी

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात दिवसाला जवळपास 6 हजारपर्यंत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोना नियमावली देखील कडक करण्यात आली आहे.

border reality check
रियालिटी चेक
author img

By

Published : Feb 24, 2021, 7:57 PM IST

Updated : Feb 24, 2021, 9:25 PM IST

मुंबई - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. राज्यात दिवसाला जवळपास 6 हजारपर्यंत कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोरोना नियमावली देखील कडक करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकामध्ये प्रवेश दिला जात नाही. तसेच इतर राज्यांनीही महाराष्ट्रातील नागरिकांना प्रवेश देण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत.

महाराष्ट्र-मध्यप्रदेश, महाराष्ट्र-आंध्रप्रदेश, महाराष्ट्र-गुजरात, महाराष्ट्र-कर्नाटक व महाराष्ट्र- छत्तीसगड या सीमेवरील सध्याची परिस्थिती काय आहे? याबाबत 'ई टीव्ही भारत'ने केलेला रियालिटी चेक...

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर तपासणी नाही

महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरून प्रतिनिधी ओमप्रकाश सपाटे यांनी घेतलेला आढावा

महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्यप्रदेश सीमेवर आज ई टीव्ही भारतने रियालिटी चेक केला. यावेळी महाराष्ट्र- मध्यप्रदेश सीमेवर कोणतीही तपासणी केली जात नाही. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून मध्यप्रदेशमध्ये जाणाऱ्या किंवा मध्यप्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या लोकांची कोणतीही कोरोना तपासणी या ठिकाणी करत असल्याचे दिसून येत नाही आहे. तसेच कोरोना संदर्भातल्या नियमांची तपासणी करण्यासाठी कोणतीही सुविधा, चेक पोस्ट याठिकाणी उपलब्ध नाही.

कर्नाटक चेकपोस्टवर कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कर्नाटक सरकारकडून कोरोना चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्याच्या कर्नाटक सीमेवरील कागवाड या ठिकाणी तपासणी करून कर्नाटक राज्यात प्रवेश दिला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून याची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

कर्नाटक सरकारकडून गेल्या 4 दिवसांपासून महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या प्रवाशांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्याच्या महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील कर्नाटक हद्दीतील कागवड याठिकाणी कर्नाटक सरकारकडून कोरोना चेक पोस्ट उभारण्यात आला आहे. दोन दिवसांपासून या ठिकाणी थोडी ढिलाई होती. मात्र, आता या ठिकाणी प्रवेशाबाबत कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. सरसकट प्रवाशांची आता थर्मल स्कॅनिंग मशीनद्वारे तपासणी करण्यात येत आहे. त्यानंतरच कर्नाटकमध्ये महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना प्रवेश देण्यात येत आहे. कर्नाटक पोलीस आणि आरोग्य प्रशासनाकडून याठिकाणी कसून तपासणी करण्यात येत आहे. प्रत्येक प्रवाशाला मास्क वापरणे बंधनकारक असण्याबरोबर कोरोनाच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच कोरोना संशयास्पद व्यक्ती असल्यास त्याच्याकडून कोरोना टेस्ट प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे, अन्यथा त्या प्रवाशाला कर्नाटकमध्ये प्रवेश देण्यात येत नाही.

यासंदर्भातल्या सर्व बातम्या वाचा येथे

कर्नाटकात जाताना महाराष्ट्रातील प्रवाशांना कोरोनाची तपासणी बंधनकारक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर कोरोना चेक पोस्ट सुरू, तपासणीनंतर कर्नाटकमध्ये प्रवेश

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर प्रवाशांची तपासणी

धक्कादायक! वाशिमच्या देगावमध्ये निवासी शाळेतील 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

Last Updated : Feb 24, 2021, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.