ETV Bharat / state

LIVE UPDATE : महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या वाढली; औरंगाबाद शहरात नाईट कर्फ्यू लागू

corona
कोरोना
author img

By

Published : Feb 23, 2021, 6:20 AM IST

Updated : Feb 23, 2021, 6:11 PM IST

17:50 February 23

राज्यात सर्वाधिक तरुण कोरोनाचे शिकार

कोरोनाचा सर्वाधिक धोका हा वृद्धांना, पन्नाशी पार केलेल्या आणि सहव्याधी असलेल्यांना आहे असे सातत्याने तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. राज्यात मात्र वेगळेच चित्र आहे. कारण महाराष्ट्रात तरुण वर्ग मोठ्या संख्येने कोरोनाचे शिकार होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. एकूण बाधितांपैकी सर्वाधिक 21.03 टक्के  बाधित हे 31 ते 40 या वयोगटातील आहेत. 21 लाख 7 हजार 224 (21 फेब्रुवारीपर्यतच्या अहवालानुसार) रुग्णांपैकी 4 लाख 43 हजार 219 रुग्ण हे या गटातील आहेत. तर रुग्णांच्या आकडेवारीत तिसऱ्या क्रमांकावर 21 ते 30 हा वयोगट असून एकूण बाधितांपैकी 16.45 टक्के अर्थात 3 लाख 46 हजार 651 रुग्ण या गटातील आहेत.  

15:51 February 23

हळदी-कुंकू कार्यक्रमात कोरोना नियमावलीचे उल्लंघन, भाजप नगरसेविकेविरोधात गुन्हा दाखल

पुणे - पोलिसांची परवानगी न घेता हळदी-कुंकवाचा कार्यक्रमाचे आयोजन केल्यामुळे भाजपच्या नगरसेविके विरोधात पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कोरोना नियमावलीचे पालन न करता १८०० ते २००० महिलांची गर्दी जमवली होती. याप्रकरणी आता भाजपच्या विद्यमान नगरसेविका विजयालक्ष्मी मोतीलाल हरिहर यांच्यासह आणखी दोघांवर खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ फेब्रुवारीला गंजपेठेतील महात्मा फुले वाडा रस्ता परिसरात हा कार्यक्रम पार पडला. 

15:50 February 23

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी पुणे पोलिसांचं पथसंचलन

पुणे - पुणे शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणत वाढत आहेत. दररोज 500 ते 600 रुग्ण शहरात सापडत आहेत. नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचं पालन करावं यासाठी आज शहरातील विविध रस्त्यांवर पोलीस आणि रॅपिड अॅक्शन फोर्सच्या माध्यमातून पथसंचलन करून जनजागृती करण्यात आली.

15:37 February 23

सोलापूर जिल्हाधिकारी शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

सोलापूर - कोरोना विरोधात सर्वशक्तीनिशी लढून सोलापूर जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी गेल्या दहा महिन्यापासून शर्थीचे प्रयत्न करणाऱ्या सोलापूर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

15:32 February 23

जळगावात शाळा-महाविद्यालये पुन्हा बंद

जळगाव - जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे 22 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान जिल्ह्यातील सर्वच शाळा आणि महाविद्यालये पुन्हा एकदा बंद करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची विद्यार्थ्यांना भीती वाटत आहे. राज्य शासनाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती विद्यार्थी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे. 

15:29 February 23

औरंगाबाद शहरात 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू लागू

औरंगाबाद - औरंगाबाद जिल्ह्यात आज रात्रीपासून 14 मार्चपर्यंत नाईट कर्फ्यू  जाहीर करण्यात आला आहे. शहरात वाढत्या कोरोना रुग्णसंख्या पाहता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. 

15:14 February 23

मुंबईत कोरोना वाढला; मुख्यमंत्र्यांनी बोलावली आढावा बैठक

मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्याने पालिकेची डोकेदुखी वाढली आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली आहे.

12:47 February 23

कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन लेडीज बारसह एकूण पाच रेस्टॅारंट सील

ठाणे - कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन लेडीज बारसह एकूण पाच रेस्टॅारंटवर महापालिकेच्या पथकाने धडक कारवाई करत पाचही बार सील केले. ही कारवाई काल उशीरा रात्री करण्यात आली. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही धडक कारवाई करण्यात आली.

12:28 February 23

मुंबई : रेल्वे स्थानकावर विनामास्क फिरल्यास 200 रुपये दंड

मुंबई - आता रेल्वेस्थानकात विनामास्क आढळल्यास 200 रुपये दंड आकारण्यात येणार आहे. बोरवली स्थानकामध्ये या मोहिमेची सुरुवात झाली असून पोलीस अधिकारी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर व रेल्वे प्रवाशांवर कारवाई करताना दिसत आहेत.

12:19 February 23

लॉकडाउनचा आढावा घेण्याकरिता अमरावती पोलीस आयुक्त रस्त्यावर

अमरावती  -  जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता अमरावती शहर, अचलपूर शहर व अन्य नऊ गावात सात दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. दरम्यान लोकांनी हे लॉकडाउन पूर्णपणे पाळले पाहिजे, यासाठी अमरावती शहरात ठीक-ठिकाणी तबल दोन हजार पोलीस तैनात आहे. लॉकडाउन व पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेण्यासाठी अमरावती शहराच्या पोलीस आयुक्त आज रस्त्यावर उतरल्या होत्या. देशात अनलॉक झाल्यानंतर लॉकडाऊन झालेले अमरावती हे देशातील पहिले शहर आहे. या लॉकडाऊनमध्ये सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.

11:44 February 23

साताऱ्यात नाईट कर्फ्यूच्या पहिल्यादिवशी ढिलाई

सातारा - लाॅकडाऊनच्या काळात कर्फ्यू लोकांच्या अंगवळणी पडला आहे. 'काही नाही होत, चालतं' या स्वभावामुळे कोरोनाने जिल्ह्यात पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केली. नाईट कर्फ्यूदरम्यान लोक रस्त्यावर शतपावली करताना, रस्त्यावर गप्पा मारताना बसलेले पहायला मिळाले. अपुऱ्या मनुष्यबळामुळे पोलीस यंत्रणेला 'कुठे जाऊ अन् कुठे नको' असे झाले.  1 फेब्रुवारी पासून जिल्ह्याचा पॉझिटीव्ह रेट 17.02 टक्के झाला आहे. या पार्श्वभूमी जिल्ह्यात प्रशासनाने 'नाईट कर्फ्यु' लावला आहे. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळात संचारबंदी लागू करण्यात आली. महामार्गांवरील हॉटेल, रेस्टॉरंट वगळून इतर ठिकाणी 11 नंतर बंद ठेवण्यात य़ेत आहेत.

11:18 February 23

'कडक नियम लावा पण, लॉकडाऊन टाळा'; मुंबईकरांची विनंती

मुंबई - राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊन लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. दरम्यान, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. रुग्णवाढीची आकडेवारी आणि नागरिक शिस्तपालन करतात की नाही, हे तपासून टाळेबंदी लागू करण्याबाबत आठ-दहा दिवसांनी निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकांमध्ये लॉकडाऊनची धास्ती वाढू लागली आहे. 'निर्बंध अधिक कडक करा पण, लॉकडाऊन करू नका' असे मत सर्वसामान्या मुंबईकरांनी व्यक्त केले आहे.

10:49 February 23

लातूर : एकाच वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

लातूर - गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या मंदावली होती. मात्र, सोमवारी 63 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय एकाच वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याने पुन्हा एकदा कोरोनाचे सावट वाढू लागले आहे. शहरातील एमआयडीसी परिसरातील एका वसतिगृहातील एका मुलीला कोरोनाची लागण झाली होती. मुलीच्या संपर्कात आलेल्या इतर 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 343 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत 703 जणांना जीव गमवावा लागला आहे.

10:46 February 23

अमरावती शहराचे शांत रुप ड्रोन कॅमेऱ्यात कैद

ड्रोन कॅमेऱ्यात कैद

अमरावती - जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. याला काल(सोमवार) रात्री आठ वाजल्यापासून सुरुवात झाली. दररोज वाहनांचा कर्कश आवाज, लोकांची गर्दी, खुल्या असलेल्या बाजारपेठा यामुळे गजबजणारी अंबानगरी आज लॉकडाऊनमुळे शांत आहे. वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य दिसत आहेत. अमरावती शहराचे हे शांत रुप ईटीव्ही भारतचे प्रेक्षक अक्षय इंगोले यांनी ड्रोन कॅमेरात टिपले आहे.

10:15 February 23

नाशिक : नाईट कर्फ्यूदरम्यान पोलिसांकडून ठिकठिकाणी कडक नाकाबंदी

ठिकठिकाणी नाकाबंदी

नाशिक - कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला असून पालकमंत्री छगन भुजबळ यांनी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदीचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पहिल्या दिवशी रात्री 11 वाजेपासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील सर्वच 13 पोलीस ठाण्यांमधील विविध ठिकाणी बॅरिकेडद्वारे कडक नाकाबंदी करण्यात आली आहे.

09:38 February 23

जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

जळगाव - कृषी उत्पन्न बाजार समितीत  पुन्हा एकदा सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. बाजार समितीत शेतकरी, व्यापारी आणि विक्रेते यांची मोठी गर्दी उसळलेली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अनेकांच्या तोंडावर मास्क नाही. सोशल डिस्टन्सिंगचा कुठलाही अवलंब केलेला दिसून येत नाही. यासंदर्भात प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.

08:22 February 23

राज्यात मुंबई, पुणे आणि ठाण्यात सर्वाधिक लसीकरण

मुंबई - कोरोना विषाणूची लागण होऊ नये म्हणून राज्यात १६ जानेवारीपासून लसीकरण सुरू आहे. शनिवार २० फेब्रुवारीपर्यंत राज्यात मुंबई, पुणे आणि ठाणे येथे सर्वाधिक लसीकरण झाले आहे. तर सर्वात कमी हिंगोली, वाशीम, सिंधुदुर्ग आणि उस्मानाबाद येथे लसीकरण झाले आहे. २० फेब्रुवारीपर्यंत ८ लाख ९७ हजार ४१३ लाभार्थ्यांना कोव्हीशिल्ड व कोवॅक्सिन ही लस देण्यात आली आहे. राज्यात लसीकरणादरम्यान कोणत्याही लाभार्थ्यांना दुष्परिणाम झाल्याचे निदर्शनास आले नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.    

08:18 February 23

मुंबई : महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला दादरच्या भाजी मार्केटचा आढावा

महपौरांची प्रतिक्रिया

मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज सकाळी दादर भाजी मार्केटचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी कोरोनासंदर्भात आवश्यक त्या सुचना केल्या.

07:54 February 23

पुणे : नाईट कर्फ्यूदरम्यान काहींवर कारवाई; तर काहींना समज

प्रतिनिधीचा रिपोर्ट

पुणे - जिल्ह्यांत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. दरोरोज पुण्यात 500 ते 600 नवीन कोरोना रुग्ण सापडत आहे. याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुन्हा रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय पुन्हा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात आज मध्यरात्रीपासूनच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोठ्याप्रमाणावर पोलिसांकडून ठिकठिकाणी कारवाईस सुरू आहे. मात्र, असे असतानाही काही पुणेकर मात्र अजूनही निवांत असून रस्त्यावर विनामास्क फिरत आहेत. पुण्यात आज संचारबंदीचा पहिलाच दिवस असल्याने विनामास्क फिरणाऱ्यावर कारवाई, तर काहींना समज देऊन सोडण्यात आले. एकीकडे प्रशासन कोरोनाला रोखण्यासाठी पाहिजे ते प्रयत्न करत आहे, तर दुसरीकडे पुणेकर मात्र नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे.

07:35 February 23

सोमवारी या विभागात सर्वाधिक रुग्ण

corona live
आकडेवारी

मुंबई पालिका - 761

नागपूर पालिका - 643

अमरावती पालिका - 555

पुणे पालिका - 336

पिंपरी चिंचवड पालिका - 207

औरंगाबाद पालिका - 194

अकोला पालिका -167

पुणे - 145

बुलढाणा - 135

कल्याण डोंबिवली पालिका - 134

ठाणे पालिका - 132

नागपूर - 130

नाशिक पालिका - 127

नवी मुंबई पालिका - 108

अमरावती - 94

यवतमाळ - 94

अहमदनगर - 81

जळगाव - 70

जळगाव पालिका - 65

वाशीम - 50

वर्धा - 90

06:50 February 23

पिंपरी-चिंचवड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चौका-चौकात नाकाबंदी

प्रतिनिधीची रिपोर्ट

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात  सोमवारीपासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी दंडुके उगरात अनेकांना पहिल्याच दिवशी लाठीचा प्रसाद दिला. संचारबंदी लागू केल्यानंतर घटनास्थळावरून 'ईटीव्ही भारत'चा रिपोर्ट 

06:02 February 23

उपराजधानीत कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ; 8 जणांचा मृत्यू

corona-live-update
संग्रहित

नागपूर -  मध्यंतरी काही दिवस रुग्ण मिळत नसल्याने लोक बिनधास्त झाले होते. परंतु आता पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. त्यामुळे कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. शाळा महाविद्यालये 7 मार्चपर्यंत बंद करण्यात आले आहेत. यासोबत मागील काही दिवसांत रुग्णसंख्या वाढत आहे. 48 तासांत 16 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून यात 5 बाहेर जिल्ह्यातील, तर 11 शहर आणि ग्रामीण भागातील आहे. आता शनिवार रविवार असे दोन दिवस बाजारपेठा बंद राहणार आहे. शिवाय रात्री 9 नंतर बाजारात गर्दी राहू नये, यासाठी प्रशासन कठोर पाऊले उचलण्यासाठी सज्ज झाले आहे.  

अशी आहे आकडेवारी -

नागपूरमधील शहरी भागात 4, ग्रामीण भागात 2 तर, 2 बाहेर जिल्ह्यातील असे 8 जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून आतापर्यंत 4283 जणांचा नागपूरात मृत्यू झाल्याची नोंद आहे. सध्या नागपूर जिल्ह्यात 6262 रुग्ण सक्रिय आहे. यात शहरात पॉझिटीव्ह रुग्णाची संख्या अधिक असून 5196 आहे. तेच ग्रामीण भागात 1093 रुग्ण पॉझिटीव्ह आहे. सोमवारी शहर आणि ग्रामीण भागात 710 रुग्ण आढळून आले आहे.

Last Updated : Feb 23, 2021, 6:11 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.