ETV Bharat / state

लक्झरी गाड्यांच्या व्यावसायिकांना बसतोय कोरोनाचा फटका - मुंबई लेटेस्ट बातमी

कोरोनामुळे लक्झरी गाड्यांचा व्यवसाय हा जवळजवळ ८०% कमी झाला आहे. फक्त २०% उत्पन्न व्यायवसायिकांना मिळत आहे. त्यात डिझेल आणि पेट्रोल ह्यांचे वाढणारे दर लक्झरी गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना अजून संकटात टाकत आहे.

खाजगी वाहन फटका
खाजगी वाहन फटका
author img

By

Published : Mar 27, 2021, 11:02 PM IST

मुंबई - शहराचा रस्ता असो वा जिल्ह्याची बाजारपेठ सगळीकडे आपल्याला एक गोष्ट सारखी दिसते. ती म्हणजे मोठा मोठ्या लक्झरी गाड्या. काही लक्झरी गाड्या ह्या खाजगी असतात , काही व्यावसायिक कारणासाठी वापरल्या जातात. मुंबई पुणे ह्यांसारख्या शहरात लक्झरी गाड्यांचा व्यवसाय हा मोठा प्रमाणात आहे. खाजगी टूर्स असो वां लग्नाचे समारंभ लक्झरी गाड्या ह्या आवडीने वापरल्या जातात. खाजगी असो वा व्यावसायिक एकंदरीत गाड्यांचा वापर जोरात असतो. मात्र कोरोनाचा फटका ह्या लक्सरी गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांनाही बसला आहे.

आर्थिक कंबरडे मोडले
कोरोनामुळे लोकडाऊन लागले आणि सर्व व्यवहार ठप्प झाले. लग्नसराई असो वा टुरिजम असो लक्झरी गाड्याचा व्यवसाय नियमितपणे चालतो. परंतु टाळेबंदी शिथिलीकरणानंतरही हा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यांना दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहेत. लक्झरी गाड्यांचा व्यवसाय सध्या एक तोट्याचा व्यवसाय ठरत आहे. कोरोनामुळे लक्झरी गाड्यांचा व्यवसाय हा जवळजवळ ८०% कमी झाला आहे. फक्त २०% उत्पन्न व्यायवसायिकांना मिळत आहे. त्यात डिझेल आणि पेट्रोल ह्यांचे वाढणारे दर लक्झरी गाड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना अजून संकटात टाकत आहे. आधीच आर्थिक कंबरडे मोडले असल्याने आणि दुसरीकडे खचलेला व्यवसाय ह्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी सुध्दा उत्पन्न मिळत नसल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.

लक्झरी व्यावसायिक प्रतिक्रिया

व्यावसायिकांमध्ये धास्तीच वातावरण
'आर्थिक उलाढाल तसेच कोरोनची परिस्थिती अनाकलनीय असल्याने लक्झरी गाड्यांचा व्यवसाय करणारे अडचणीत आले आहेत. त्यात अपुरे शिक्षण, इतर आर्थिक उत्पन्न नसल्याने प्रचंड आर्थिक अडचणीत आहेत. लक्झरी गाड्यांच्या किमती महाग असल्याने त्यांचा देखभाल करण्याचा खर्च वेगळा एकंदरीत आर्थिक भार वाढला आहे. इतर वेळेस महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपयांची कमाई होते. मात्र, आता काहीच कमाई नाही,’असे व्यावसायिकांनी सांगितले आहे. परिस्थिती पूर्ववत झाली तरी आमच्याकडे पहिल्यासारखी मागणी पूर्ववत व्हायला वेळ लागणार आहे. असेही व्यावसायिकांचे मत आहे. त्यामुळे लक्झरी गाड्यांच्या व्यावसायिकांमध्ये धास्तीच वातावरण आहे.

हेही वाचा-राज्यातील कोरोना स्थिती बिकट; पाहा दिवसभरातील सर्व घडामोडी

हेही वाचा-राज्यात आज आठ वाजल्यापासून जमावबंदी; 'हे' कडक निर्बंध लागू, सरकारकडून नवीन गाईडलाईन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.