ETV Bharat / state

कोरोनामुळे बकऱ्यांचा बाजार भरलाच नाही, पशुवधगृहाच्या उलाढालीवर परिणाम

पशुवधगृहात जगातील सर्वात मोठा बाजार भरतो. कोरोनामुळे पशुवधगृह बंद ठेवण्यात आले होते. दिवसाला इथे २५ हजार पशूंची खरेदी-विक्री होते. ३ जुलैपासून पशुवधगृह पुन्हा सुरू करण्यात आले आहे. मात्र, कोरोना असल्याने महिनाभरात कोणी या बाजारात आलेले नाही. पशुवधगृह निर्जंतुकीकरण करणे आवश्यक असल्याने आणि त्याला वेळ लागत असल्याने पशुवधगृहाची वेळही कमी केली होती. त्यामुळे यावर्षी बाजार बंद करण्यात आला असल्याची माहिती पशुवधगृहातील अधिकाऱ्याने दिली.

कोरोनामुळे बकऱ्यांचा बाजार भरलाच नाही
कोरोनामुळे बकऱ्यांचा बाजार भरलाच नाही
author img

By

Published : Aug 5, 2020, 10:59 PM IST

मुंबई - बकरी ईदनिमित्त मुंबई महापालिकेच्या देवनार पशुवधगृहात दरवर्षी बकऱ्यांचा मोठा बाजार भरतो. मात्र यंदा कोरोनामुळे हा बाजार सरकारच्या सूचनानुसार बंद ठेवण्यात आला. तसेच, तीन दिवसात ४५० म्हशींच्या कुर्बानीची परवानगी असताना ३०० म्हशींची कुर्बानी देण्यात आल्याचे पशुवधगृह प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे याठिकाणी होणाऱ्या कोट्यवधींच्या उलाढालीवर आणि पालिकेच्या महसुलावरही परिणाम झाला आहे.

बकरी ईदनिमित्त दरवर्षी देवनार पशुवधगृहात बक-यांचा मोठा बाजार भरतो. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे यंदा गणेशोत्सवप्रमाणे बकरी ईदही साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यामुळे देवनार पशुवधगृहात दरवर्षी भरणारा बाजार यंदा भरला नाही. मात्र बकऱ्यांची ऑनलाईन खरेदी करण्याबाबतच्या सूचना आहेत. त्यामुळे येथील बाजार बंद ठेवण्यात आला आहे. देवनार पशुवधगृहातील बकऱ्यांच्या मांसाची मुंबई शहरातील विविध दुकानात विक्री केली जाते. यातून मुंबई महापालिकेला मोठा महसूल मिळतो. बकरी ईदच्या काळात मांसाला अधिक मागणी असते. बकरी ईद निमित्ताने देवनार कत्तलखान्यात दरवर्षी अडीच लाख बकरे व बारा हजार म्हशींची विक्री होत असे. मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर मोठा परिणाम झाला आहे. यंदा देवनार कत्तल खान्यात बकरी ईदसाठी बकऱ्यांची आवक झाली नाही आणि बाजारही भरला नाही. दररोज फक्त १५० म्हशींच्या कुर्बानीला परवानगी देण्यात आली आहे. शनिवारी १५० पैकी फक्त ३३ तर रविवारी सायंकाळपर्यंत १३३ म्हशींची आणि सोमवारी १४४ अशी तीन दिवसांत ३०० म्हशींची कुर्बानी देण्यात आली आहे.

देवनार पशुवधगृहात दरवर्षी बकरी ईदसाठी जनावरांचा बाजार भरविण्यात येतो. या बाजारात राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, बिहार आदी राज्यातून साधारणतः अडीच लाख बकऱ्यांची आवक होत असते. तर १२ हजारापर्यंत म्हशींची विक्री होत असे. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असे. मुंबई महापालिकेला दरवर्षी या बकरी ईदसाठी जनावरांसाठी जागा करणे, पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, वीज, चारा, शौचालय, जनावरांच्या कुर्बानीची व्यवस्था करणे आदी सुविधा देण्यासाठी ८ कोटी रुपयांचा खर्च येत असे. पालिकेला या जनावरांच्या विक्रीतून शुल्कापोटी २ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत असते. बकरी ईदला बकऱ्यांना चांगला भाव मिळत असल्याने, अनेक व्यापारी बकरी ईदची वाट पाहत असतात. मात्र या वर्षीच्या बंदीमुळे व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.