ETV Bharat / state

CSMT : सीएसएमटी रेल्वे स्टेशनमध्ये शॉक लागून कंत्राटी स्वच्छ्ता कर्मचाऱ्याचा मृत्यू - रेल्वे स्टेशनमध्ये शॉक लागून कर्मचाऱ्याचा मृत्यू

मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमधील एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आज सोमवार (दि. 16 जानेवारी)रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एका कंत्राटी कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे रेल्वे मध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या घटनेनंतर कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

CSMT
सीएसएमटी
author img

By

Published : Jan 16, 2023, 10:49 PM IST

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावर दिवसाला लाखो प्रवासी ये जा करतात. लाखो प्रवाशांची ये-जा असल्याने हे स्थानक स्वच्छ ठेवण्यासाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या सीएनडब्यलू यार्डमधील शौचालयाची स्वच्छता प्रेशर मशीने करत असताना, एका स्वच्छता कर्मचाऱ्यांला विजेचा शॉक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांचे नाव रफिक शेख आहे. काम करीत असताना तो खाली पडला. तेव्हा कर्मचाऱ्यांनी तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तोपर्यंत त्या कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला. या घटनेनंतर कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले आहे.

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर : या घटनेबाबत बोलताना, गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी कंत्राटदारांकडून घेतली जात नाही. परिणामी आजच्या सारख्या घटना घडतात. रेल्वे प्रशासनाने आणि कंत्राटदाराने भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी सुरक्षेची पुरेपूर काळजी घ्यावी तसेच मृत कंत्राटी कर्मचाऱ्याच्या मुलाला रेल्वेत नोकरी द्यावी, अशी मागणी रेल्वे कॉन्ट्रॅक्ट लेबर संघाचे महामंत्री अमित भटनागर यांनी केली आहे.

माटुंगा वर्कशॉपमध्ये काम बंद आंदोलन : मध्य रेल्वेच्या माटुंगा वर्कशॉपमध्ये रविवारी रविवारी कृष्ण मोहन वर्मा या कर्मचाऱ्यांचा क्रेनवरुन पडून अपघाती मृत्यु झाला आहे. तर, दुसऱ्या एक कर्मचारी जखमी झाला आहे. कृष्ण मोहन वर्माला रेल्वेच्या भायखळा रुग्णालयात नेण्यात आले. तेथून त्याला जसलोकला पाठवण्यात आले. परंतु, तोपर्यत त्या कर्मचाऱ्यांचा मृत्यु झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे जखमी कर्मचाऱ्याला रुग्णालयात नेण्यासाठी वर्कशॉपमध्ये रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यामुळे त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेता आले नसल्याचे तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

तनावाचे वातावरण : या एक कर्मचारी मधुकर हिरवळे हा जखमी असून त्याच्यावर भायखळा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या दोन महिन्यात अपघाताच्या येथे सहा घटना घडल्या आहेत. रेल्वे प्रशासन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत उदासिन असल्याने आक्रमक झालेल्या कर्मचाऱ्यांनी आज सोमवारी कामबंद आंदोलन केले. या कर्मचाऱ्याचा मृत्यू झला त्याचा तपास व्हावा अशीही मागणी येथे करण्यात आली आहे. तसेच, येथे बराचवेळ तनावाचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा : Aaditya Thackeray On BMC Corruption : BMC भष्ट्रचारावरुन आदित्या ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.