ETV Bharat / state

Nana Patole Criticism on Central Government : ...तर देशातही श्रीलंकेसारखी परिस्थिती निर्माण होईल - नाना पटोले - बेरोजगारी

केंद्र सरकार ( Central Government ) बेरोजगारी, महागाई या विषयांवर काहीच न बोलता मुळ मुद्द्यापासून केंद्र सरकार जनतेला दूर नेत आहे. केवळ धार्मिक मुद्द्यांवर वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. मूळ मुद्द्यांपासून सामान्य जनतेचे लक्ष विचलित व्हावे, असे षड्यंत्र केंद्र सरकार करत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

नाना पटोले
नाना पटोले
author img

By

Published : Apr 5, 2022, 4:49 PM IST

मुंबई - सध्या देशामध्ये महागाईचा आगडोंब आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडत असून दररोज इंधनाचे दर वाढत आहेत. केवळ काही मोजक्या व्यापाऱ्यांचे खिसे भरले जातील, अशी नीती केंद्र सरकार ( Central Government ) वापरत आहे. अशीच परिस्थिती देशांमध्ये राहिल्यास आपल्या देशाची ही परिस्थिती श्रीलंकेसारखी होण्यास विलंब लागणार नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी दिला. आपल्या निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केंद्र सरकारवर त्यांनी निशाणा साधला ( Nana Patole Criticism on Central Government ).

केंद्र सरकार सामान्य जनतेचे लक्ष विचलित करत आहे - केंद्र सरकार ( Central Government ) बेरोजगारी, महागाई या विषयांवर काहीच न बोलता मुळ मुद्द्यापासून केंद्र सरकार जनतेला दूर नेत आहे. केवळ धार्मिक मुद्द्यांवर वक्तव्य करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. मूळ मुद्द्यांपासून सामान्य जनतेचे लक्ष विचलित व्हावे, असे षड्यंत्र केंद्र सरकार करत आहे, अशीही टीका नाना पटोले यांनी केली आहे.

पंतप्रधानांनी महागाई कमी करण्यासाठी सर्वपक्षीय बोलवावी बैठक - देशात दररोज महागाई वाढत चालली आहे. ही महागाई कमी व्हावी, यासाठी पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठक बोलावून चर्चा करणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वपक्षीय बैठक पंतप्रधानांनी लवकरात लवकर बोलवावी, अशी मागणी नाना पटोले यांनी केली. तसेच महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा घेऊन काँग्रेस जनतेत उतरेल, असा इशाराही पटोले यांनी दिला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut On ED Action : मनी लॉन्ड्रिंग सिद्ध झाल्यास सगळी प्रॉपर्टी भाजपला दान करेल : संजय राऊत आक्रमक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.