ETV Bharat / state

हे सत्ता प्रायोजित हप्ता कांड..! वाझे कांडावर निरुपमांचा शिवसेनेवर निशाणा

शिवसेना माजी आयुक्त परमबिर सिंह यांचा जयजयकार करत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परबिरसिंह यांनी चूक केली होती, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या दोन्ही भूमिका विरोधाभासी आहेत आणि या भूमिका सरकारच्या प्रतिमा डागाळू शकते.

निरुमपांचा शिवसेनेवर निशाणा
निरुमपांचा शिवसेनेवर निशाणा
author img

By

Published : Mar 19, 2021, 11:37 AM IST

Updated : Mar 19, 2021, 1:43 PM IST

मुंबई - अँटिलिया स्फोटके आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाली. त्यानंतर तपासात धक्कादायक खुलासे समोर आले. या सर्व घटनांमुळे मुंबई पोलिसांची बदनामी झाली. या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मुंबईचे पोलीस आयुक्त परबिर सिंह यांची उचलबांगडी केली. यावरून आता काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

सरकारची प्रतिमा डागाळू शकते-

वाझे प्रकरणात पोलीस दलात झालेल्या बदल्यांवरून निशाणा साधताना संजय निरुपम यांनी म्हटले आहे, की 'शिवसेना माजी आयुक्त परमबिर सिंह यांचा जयजयकार करत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परबिरसिंह यांनी चूक केली होती, असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे या दोन्ही भूमिका विरोधाभासी आहेत आणि या भूमिकांमुळे सरकारची प्रतिमा डागाळू शकते.'

हे तर हप्ता कांड-

वाझे कांडाच्या तपासातून हे समजते की, हे प्रकरण सत्ता प्रायोजित हफ्ता वसुली कांड आहे. या हप्ता वसुलीकांडाचे धागेदोरे शिवसेनेशी जोडले आहेत का? असा सवाल करत निरुपम यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांनी अधिकाराचा गैरवापर केल्याचे एनआयए तपासात समोर आले होते. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी वाझे काय लादेन आहे काय? असे म्हटले होते. त्यानंतर एटीएसने वाझेंना अटक केली होती. दरम्यान या सर्व प्रकरणात मुंबई पोलिसांची बदनामी झाली. या सर्व घडामोडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आयुक्तपदी नगराळे यांना बसविण्यात आले. तर परबिरसिंग यांच्याकडे होमगार्ड विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Last Updated : Mar 19, 2021, 1:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.