ETV Bharat / state

Ashok Chavan On Karnataka Result : 'जनतेला विकास हवा, देव-धर्माचे राजकारण नाकारले', अशोक चव्हाणांची भाजपवर टीका - कर्नाटक निकालावर अशोक चव्हाण

कर्नाटकात काँग्रेसला समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाला आहे. हा विकासाचा, सर्वसमावेशकतेचा आणि एकतेचा विजय आहे, असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. तसेच धर्माचे राजकारण करणाऱ्यांनी जनतेने नाकारले, असेही ते म्हणाले.

Ashok Chavan
अशोक चव्हाण
author img

By

Published : May 13, 2023, 7:12 PM IST

अशोक चव्हाण

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्या नंतर कॉंग्रेस पक्षात सध्या आनंदाचे वातावरण आहे. पक्षाचे नेते मोदी आणि शहांवर खरपूस टीका करत आहेत. कॉंग्रेसच्या या विजयावर माजी मुख्यमंत्री आणि जेष्ठ कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जनतेला विकास हवा आहे. देव - धर्माच्या नावावर राजकारण नको. देव - धर्म ही वैयक्तिक आस्थेची बाब आहे. त्यावरून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कराल तर 'ऊपर वाले की लाठी में आवाज नहीं होती', असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. ते आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.

काँग्रेसला समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाला : अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, 'काँग्रेसला समाजाच्या सर्व स्तरांतून पाठिंबा मिळाला आहे. हा विकासाचा, सर्वसमावेशकतेचा आणि एकतेचा विजय आहे. रोजगार, महागाई, सुरक्षा, शांतता, विकास हेच जनतेचे प्रमुख मुद्दे आहेत. काँग्रेसने लोककल्याणकारी योजनांचा जाहीरनामा मांडला. त्यातील आश्वासने एका वर्षात पूर्ण करण्याचा शब्द दिला आणि लोक काँग्रेसच्या पाठीशी उभे राहिले.

'भाजपला कर्नाटकात विकास करता आला नाही' : अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, भाजप डबल इंजीनचा गवगवा करते. मात्र कर्नाटकमध्ये त्यांना विकास करता आला नाही. शेवटी त्यांनी देव - धर्माच्या नावावरंच मतांचे धृवीकरण करण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून दिलेला बंधुभावाचा संदेश लोकांना भावला. काँग्रेसच्या विचारधारेला समर्थन मिळाले. कर्नाटकातील विजयाचा पाया भारत जोडो यात्रेतच रचला गेला असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा :

  1. Devendra Fadnavis on Karnataka Result : कर्नाटक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रावर...
  2. Karnataka Election Result : कर्नाटकातील कॉंग्रेसच्या विजयामागे आहे 'हे' प्रमुख कारण, जाणून घ्या..
  3. Sanjay Raut On Karnataka Result : बजरंग बलीची गदा भाजपवरच पडली; कर्नाटक निकालावर संजय राऊतांची खोचक प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.