ETV Bharat / state

काँग्रेसची सातवी यादी जाहीर; अशोक चव्हाण, संजय निरुपम यांची नावे अद्याप गुलदस्त्यात - loksabha polls 2019

लातूर या राखीव मतदार संघात मच्छिंद्र कामत यांच्या माध्यमातून नवीन चेहरा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कामत राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले होते.

अशोक चव्हाण, संजय निरुपम
author img

By

Published : Mar 23, 2019, 6:35 AM IST

मुंबई - काँग्रेसने मध्यरात्री उशिरा लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात तामिळनाडू, ओरिसा, जम्मू- काश्मीर, छत्तीसगड आणि राज्यातील ५ अशा एकूण २२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
काँग्रेसने या यादीत जालना लोकसभा मतदार संघातून विलास औताडे यांना उमेदवारी दिली आहे. तर, औरंगाबादमधून सुभाष झांबड, भिवंडीतुन सुरेश टावरे आणि चंद्रपूरमधून विनायक बंगाडे यांना उमेदवारी दिली आहे. लातूर या राखीव मतदार संघात मच्छिंद्र कामत यांच्या माध्यमातून नवीन चेहरा देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कामत राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले होते.

राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या नावाचा मात्र या यादीत उल्लेख नाही. काँग्रेसने दोनच दिवसांपूर्वी सात उमेदवारांची यादी जाहीर केली होती यात मुंबई दक्षिणमधून माजी खासदार एकनाथ गायकवाड, शिर्डी या राखीव मतदारसंघातून भाऊसाहेब कांबळे, नंदुरबारमधून के. सी. पडावी, धुळ्यातून कुणाल पाटील, वर्ध्यातून अॅड. चारुलता टोकस आणि यवतमाळ-वाशिम मतदार संघातून विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यासोबत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नविनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे.

१३ मार्चला काँग्रेसने पाच उमेदवार जाहीर केले होते. त्यात भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यासोबतच गडचिरोलीतून डॉ नामदेव उसेंडी, उत्तर मध्य मुंबईमधून प्रिया दत्त, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा आणि सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते.

Intro:काँग्रेसची सातवी यादी जाहीर अशोक चव्हाण, संजय निरुपम यांची नावे अद्याप गुलदस्त्यात, लातूरमधून दिला नवीन चेहराBody:काँग्रेसची सातवी यादी जाहीर अशोक चव्हाण, संजय निरुपम यांची नावे अद्याप गुलदस्त्यात, लातूरमधून दिला नवीन चेहरा

मुंबई, ता. 23 :

काँग्रेसने मध्यरात्री उशिरा लोकसभा उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली. यात तामिळनाडू, ओरिसा, जम्मू- काश्मीर, छत्तीसगड आणि राज्यातील 5 अशा एकूण 22 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
काँग्रेसने या यादीत जालना लोकसभा मतदार संघातून विलास औताडे यांना उमेदवारी दिली आहे तर, औरंगाबादमधून सुभाष झांबड, भिवंडीतुन सुरेश टावरे तर चंद्रपूरमधून विनायक बंगाडे यांना उमेदवारी दिली आहे.लातूर या राखीव मतदार संघात नवीन चेहरा हा मच्छीन्द्र कामत यांच्या माध्यमातून देण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच कामत हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आले होते.
राज्यात मागील काही दिवसांपासून चर्चेत असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, आणि मुंबई प्रदेशाध्यक्ष संजय निरुपम यांच्या नावाचा मात्र या यादीत उल्लेख नसल्याचे समोर आले आहे.काँग्रेसने दोनच दिवसांपूर्वी सात उमेदवारांची यादी जाहीर केली होती यात मुंबई दक्षिणमधून माजी खासदार एकनाथ गायकवाड, शिर्डी या राखीव मतदारसंघातुन भाऊसाहेब कांबळे, नंदुरबारमधून के.सी.पडावी, धुळेमधून कुणाल पाटील, वर्ध्यातून ऍड.चारुलता टोकस आणि यवतमाळ-वाशीम मतदार संघातुन विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. त्यासोबत रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नविनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी दिली आहे.
13 मार्च रोजी काँग्रेसने पाच उमेदवार जाहीर केले होते त्यात भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात नाना पटोले यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यासोबतच गडचिरोलीतुन डॉ नामदेव उसेंडी, उत्तर मध्य मुंबईमधून- प्रिया दत्त, मुंबई दक्षिणमधून मिलिंद देवरा आणि सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे यांचे नाव जाहीर करण्यात आले होते.

Conclusion:काँग्रेसची सातवी यादी जाहीर अशोक चव्हाण, संजय निरुपम यांची नावे अद्याप गुलदस्त्यात, लातूरमधून दिला नवीन चेहरा
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.