ETV Bharat / state

Balasaheb Thorat: कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षिय बैठक बोलवावी- बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat: महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद चांगलाच पेटला असून त्यावर माजी मंत्री व काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया मांडली आहे. 'सीमा प्रश्न हा बऱ्याच वर्षाचा आहे आता त्यांनी वेगळं वळण घेतलं आहे. आतापर्यंत कधी घडलं नव्हतं ते आता घडत आहे.

Balasaheb Thorat
Balasaheb Thorat
author img

By

Published : Dec 7, 2022, 5:09 PM IST

Updated : Dec 7, 2022, 5:19 PM IST

मुंबई: कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद हा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. कर्नाटक राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली जात असताना राज्य सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही असा आरोप विरोधकांकडून सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सीमावाद प्रश्नाला एक वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. यामागे त्यांचं काय राजकारण आहे, याच्याशी आम्हाला काहीही घेणं देणं नाही.

मराठी बांधवांवर हल्ले व्हायला सुरू: मात्र ते चुकीचं राजकारण करत आहेत, असा थेट आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे सीमा भागातील मराठी बांधवांवर हल्ले व्हायला सुरू झाले आहेत. महाराष्ट्राच्या वाहनांची कर्नाटकातील सीमा भागात तोडफोड सुरू झाली आहे. हे अत्यंत निषेधार्य असल्यासही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. मुंबई प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कर्नाटक महाराष्ट्र सीमावादावर भाष्य केला आहे.

चर्चा करणे गरजेचे: ज्यावेळी कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद निर्माण झाला त्यावेळेस सर्व पक्षाच्या नेत्यांनी येऊन सीमा भागातील मराठी बांधवांच्या मागे उभे राहण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी सर्वपक्षीय नेत्यांना तात्काळ बोलून त्यांच्यासोबत चर्चा करणे गरजेचे आहे. या भागाची सद्यस्थिती काय आहे? आणि त्या परिस्थितीत राज्य सरकार नेमकं कोणतं धोरण घेणार याबाबत सर्व पक्ष नेत्यांशी चर्चा केली पाहिजे अशी मागणी बाळासाहेब थोरात यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.

Last Updated : Dec 7, 2022, 5:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.