मुंबई - काँग्रेसने विधानपरिषदेसाठी जालन्यातील युवा नेते राजेश राठोड यांची उमेदवारी जाहीर केली आहे. या जागेसाठी पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत, बसवराज पाटील यांच्यासह अनेकांची नावे चर्चेत होती. मात्र, पक्षाने राठोड यांना संधी दिली आहे.
-
INC COMMUNIQUE
— INC Sandesh (@INCSandesh) May 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Important Notification regarding elections to Maharashtra Legislative Council pic.twitter.com/1AmYTr1S3o
">INC COMMUNIQUE
— INC Sandesh (@INCSandesh) May 9, 2020
Important Notification regarding elections to Maharashtra Legislative Council pic.twitter.com/1AmYTr1S3oINC COMMUNIQUE
— INC Sandesh (@INCSandesh) May 9, 2020
Important Notification regarding elections to Maharashtra Legislative Council pic.twitter.com/1AmYTr1S3o
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कमिटीचे सदस्य असलेले राजेश जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील आहेत. राठोड कुटुंब काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले आहे. राजेश राठोड हे गेल्या विधानसभा निवडणुकीत जालना मतदारसंघातून इच्छुक होते. पक्षाकडे त्यांनी उमेदवारी देखील मागितली होती. परंतु, ऐनवेळी कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी जाहीर झाली होती.
विधानपरिषदेच्या एकूण 9 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात भाजपने चार नावांची घोषणा आधीच केलेली आहे. 5 जागा महाआघाडीच्या वाट्याला येत आहेत. त्यात काँग्रेसने 2 जागांसाठी आग्रह धरला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार की मतदान होणार? याची उत्सुकता आहे.