ETV Bharat / state

विधानपरिषदेची निवडणूक होणार, काँग्रेस दुसऱ्या उमेदवारीवर ठाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनीही शनिवारी थोरात यांनी भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे.

Legislative Assembly election
विधानपरिषद निवडणूक
author img

By

Published : May 10, 2020, 12:49 PM IST

मुंबई - विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा दबाव असतानाही काँग्रेस आपला दुसरा उमेदवार मागे घेण्याच्या तयारीत नाही. महाविकास आघाडीचे 6 उमेदवार असून त्यांना निवडून आणण्याचे नियोजन करत असल्याचे महसूलमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक मिलिंद नार्वेकर यांनीही शनिवारी थोरात यांनी भेट घेतली होती. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना संपर्क साधल्याची माहिती मिळत आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सहकार्य करावे, असे म्हटले आहे.

काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या सहीने काल दुपारी राजेश राठोड या एकमेव उमेदवारांची निवड केली होती. मात्र, नंतर प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी ट्विट करत बीडचे राजकुमार उर्फ पापा मोदी यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला. त्यांनतर महाविकास आघाडीत ही काहीही आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

संख्याबळानुसार भाजप 4, राष्ट्रवादी आणि काँग्रेस 2 तर काँग्रेस 1 जागेवर सहज विजयी होणार आहे. मात्र, 9 जागांसाठी काँग्रेसने 1 उमेदवार अतिरिक्त दिल्याने ही निवडणूक अटळ आहे. सत्ताधारी घटक पक्षांच्या दबावात आता काँग्रेस उमेदवार मागे घेणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.