मुंबई - शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत ११ ऑक्टोबरला अधिकृत संपर्क केला. त्यावर निर्णय घेण्यापूर्वी आम्हाला सर्व मुद्द्यांवर चर्चा करणे गरजेचे होते. राष्ट्रवादी आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी सोबत निवडणूक लढवली. त्यामुळे आम्ही काही बाबींवर चर्चा करू. किमान सामान्य कार्यक्रम ठरवण्यासाठी वेळ लागेल. त्यानंतर आम्ही चर्चा करू. तसेच आमच्या विचारधारेनुसारच पुढचा निर्णय घेऊ, असे वक्तव्य काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्ररित्या निवडणूक लढवली. त्यामुळे दोन्ही पक्षात चर्चा होणे गरजेचे आहे. सरकार बनवल्यानंतर काय अडचणी येतील, तसेच कोणत्या मुद्द्यांवर सरकार बनेल, या सर्व बाबींवर चर्चा करू, असे शरद पवार म्हणाले. तसेच आम्हाला राज्यपालांनी भरपूर वेळ दिला आहे. त्यामुळे आम्ही आता सर्व निर्णय आरामात घेणार आहोत, असेही पवार म्हणाले.