ETV Bharat / state

Shivsainik in confusion : संभ्रमित शिवसैनिक पाहतोय आदेशाची वाट - Shivsainik in confusion

शिवसेनेतील ( ShivSena ) निम्म्यापेक्षा अधिक आमदार बाहेर ( Legislators Out ) पडले आहेत, मात्र शिवसेनेत गद्दारांना क्षमा नाही असे म्हणणारा शिवसैनिक अजूनही का शांत आहे. शिवसैनिक संभ्रमित आहे कि आदेशाची वाट पाहतोय.

silent_shivsainik
silent_shivsainik
author img

By

Published : Jun 24, 2022, 7:55 AM IST

मुंबई - शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( ShivSena rebel leader Eknath Shinde ) सुमारे 37 आमदारांना घेऊन बाहेर पडले आहेत. भाजप ( BJP ) सोबत जाण्यासाठी पक्ष नेतृत्वावर दबाव आणला जातो आहे. महाविकासआघाडीतून बाहेर पडावे असा सातत्याने दबाव पक्षावर आणला जातो आहेच. मात्र शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर कोणत्याही नेत्याला शिवसेनेने सहज सोडले नाही. यावेळीच शिवसैनिक संभ्रमात ( Shivsainik in confusion ) दिसत आहेत.

छगन भुजबळांवर हल्ला - पहिल्यांदा शिवसेनेतून बाहेर पडलेल्या छगन भुजबळ यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला चढवला होता. या हल्ल्यातून छगन भुजबळ कसेबसे प्राण वाचवू शकले होते. त्यानंतर गणेश नाईक नारायण राणे शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरही शिवसैनिकांनी जोरदार प्रदर्शन केले होते. रस्त्यावर येऊन निषेध व्यक्त केला होता.

रवी राणा यांच्याविरोधातही जोरदार प्रदर्शन - खासदार नवनीत राणा आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करण्याचा मनसुबा बोलून दाखवला होता त्यानंतर राहणार दाम्पत्याला शिवसेनेने मुंबईत सळो की पळो करून सोडले होते. मात्र, हाच शिवसैनिक शिवसेनेतील निम्म्याहून अधिक आमदार बाहेर पडल्यानंतर ही का शांत आहे असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

संभ्रमित शिवसैनिक आदेशाची वाट पाहतोय - दरम्यान, शिवसेनेतील एवढ्या मोठ्या संख्येने आमदार बाहेर पडल्यानंतर या आमदारांना मातोश्री वरूनच संकेत आहेत का असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे. नेमकं काय राजकारण सुरू आहे हे अजूनही शिवसैनिकांना समजत नाही. शिवसैनिक संभ्रमित झाला आहे त्याला नेमकं काय करावं हे कळत नाही. किंवा कदाचित आमदारांच्या माध्यमातून शिवसैनिकांच्या भावना आज व्यक्त झाल्या असाव्यात अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ राजकीय विश्लेषक पांडुरंग मस्के यांनी व्यक्त केली. शिवसैनिक हे आदेश मानणारे आहेत कदाचित त्यांच्यापर्यंत अद्याप मातोश्रीवरून आदेश गेला नसल्यामुळे ही ते शांत असावेत असेही मस्के यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा - 3 Shiv Sena MLA in Guwaghati : शिवसेनेचे आणखी तीन आमदार एकनाथ शिंदेंच्या गोटात; गुवाहाटीत दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.