ETV Bharat / state

भाजपला सत्तेतून घालवणे हा एकच पर्याय - कॉ. डी. राजा

author img

By

Published : Oct 17, 2019, 8:55 PM IST

Updated : Oct 18, 2019, 9:40 PM IST

शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या विषयांवर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे एक शब्दही आपल्या प्रचारांच्या भाषणात काढत नाहीत. त्यांना सर्वसामान्‍य जनतेची कोणतीही फिकिर नाही. केवळ अदानी-अंबानी यांना मदत करून देशातील सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे यांचे धोरण असल्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपला सत्तेतून घालविणे हा एकच पर्याय असल्याचे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. डी. राजा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.

कॉ. डी. राजा

मुंबई - शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह हे एक शब्दही आपल्या प्रचारांच्या भाषणात काढत नाहीत. त्यांना सर्वसामान्‍य जनतेची कोणतीही फिकिर नाही. केवळ अदानी-अंबानी यांना मदत करून देशातील सार्वजनिक उद्योगांचे खासगीकरण करण्याचे यांचे धोरण आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपला सत्तेतून घालविणे हा एकच पर्याय आहे, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. डी. राजा यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केले.

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. डी. राजा यांची विशेष मुलाखत

लोकसभा निवडणुकीनंतर आपण आता विधानसभेच्या रणधुमाळीत राज्यात आला आहात, राज्यातील या विधानसभा निवडणुकीकडे आपण कसे पाहता?

कॉ. डी. राजा - मी माझ्या डाव्या पक्षांची भूमिका मांडण्यासाठी आलो आहे आणि ती मी मांडणार आहे. राज्यात जी निवडणूक सुरू आहे, त्यातून मी याविषयी इतकेच सांगेन की, राज्यात असलेली भाजप-सेना युती येथील जनतेनी यांना सत्तेतून घालवले पाहिजे. तसेच दुसरीकडे नवीन राजकीय पर्याय उभे राहण्याची गरज आहे आणि या पर्यायासाठी आम्ही लढत आहोत.

राज्यात निवडणुकांमध्ये भाजपकडून काश्मीर आणि ३७० कलम यांचा विषय समोर केला जातोय, त्यावर आपण काय सांगाल?
कॉ. डी. राजा - राज्याचे आणि देशाचे हेच मोठे दुर्भाग्य आहे. निवडणूक ही राज्यातील असताना अशा प्रकारचे मुद्दे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शाह हे उपस्थित करत आहेत. परंतु हेच लोक महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येवर मात्र, एक शब्दही बोलत नाहीत. नाशिक ते मुंबईपर्यंत शेतकऱ्यांनी एक पायी पदयात्रा काढली, परंतु या सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसली. 'सबका साथ, सबका विकास' म्हणणारी भाजप ही देशातील, राज्यातील शेतकऱ्यांसोबत नाही, हे यातून स्पष्ट होते. भाजप केवळ उद्योगपती आणि अदानी- अंबानी यांना मदत करत असून त्यांच्यासाठीच काम करताना दिसते. त्यामुळे देशातील शेतकरी, तरुण, बेरोजगार आणि युवकांसाठी ते काहीही बोलत नाहीत. म्हणूनच, आमच्या डाव्या पक्षांसोबत राज्यातील विरोधी पक्षांनी या निवडणुकीत हे मुद्दे लावून धरले पाहिजे.

देशात मोठ्या प्रमाणात रोजगार संपत चालेले आहेत, कंपन्या बंद होत आहेत अशा वेळी डाव्या संघटनांना उभारी घेण्याची संधी मिळेल, असे आपल्याला वाटते का?
कॉ. डी. राजा - आमच्या डाव्या पक्ष संघटनांचा रोजगार, नोकरी यासाठी कायम पुढाकार असतो. कोणत्याही सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करू नये, अशी आमची भूमिकाच आहे. मात्र, अशा वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हिंदू राष्ट्र आणि हिंदू संस्कृतीवर बोलत आहेत. ते परकीय गुंतवणुकीचे समर्थन करत असतात. दुसरीकडे देशातील सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करून ते सर्व उ‌द्योग ठराविक उद्योगपतींच्या घशात घालत आहेत. पीएमसी घोटाळ्या प्रकरणी लोक रस्त्यावर आलेले असताना मोदी आणि अमित शाह हे दोघे एक शब्दही बोलत नाहीत. यावर केवळ डाव्या पक्ष संघटना आणि विरोधी पक्ष काम करताना दिसत आहेत. ज्यांचे पैसे आहेत, ते सर्व गरीब लोक आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

या निवडणुकीत भाजपच्या विरोधात जी तिसरी आघाडी आहे, ती एकसंघ असल्याचे दिसत नाहीत यावर आपल्या काय वाटते?
कॉ. डी. राजा - सीपीएमसोबत आम्ही सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष, लोकशाहीवादी पक्ष आदींनी मिळून एकत्र येत भाजपला येथून हटवले पाहिजे. ज्या लोकांनी भाजपला सोबत दिली त्याही पक्षांना सत्तेतून हटवले पाहिजे. आम्ही राज्यात १६ जागांवर निवडणूक लढवत आहोत. त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षांनी आम्हाला मदत करून इतर ठिकाणी भाजपला हटवले पाहिजे, असेही आवाहन आमच्या पक्षाकडून केले जात आहे. आज डाव्या पक्ष संघटना या सामाजिक न्याय यावर कायम भर देत असतात. त्यावर काँग्रेस, वंचित यांनीही आपली भूमिका घ्यायला पाहिजे. तरच फॅसिस्ट विचारांचा योग्य मुकाबला आपण करू शकणार. मात्र त्यासाठी जनतेत जाण्याची गरज आहे, त्याशिवाय काहीही होणार नाही.

हेही वाचा - छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सत्तेतून हद्दपार करा, आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया

हेही वाचा - प्रकाश मेहतांची नाराजी विरोधकांच्या पथ्यावर...कोणाला होणार फायदा?

Intro:मुलाखत : डी. राजा , सरचिटणीस, भारतीय कम्युनिस्ट पक्ष
(यासाठी मोजोवरून त्यांचा फोटो पाठवला आहे, तो वापरावा)

mh-mum-01-d-raja-enter-7201153

इंट्रो :
शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे एक शब्दही आपल्या प्रचारांच्या भाषणात काढत नाहीत. त्यांना सर्वसामान्‍य जनतेची कोणतीही फिकिर नाही. केवळ अदानी-अंबानी यांना मदत करून देशातील सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्याचे यांचे धोरण असल्याने महाराष्ट्राच्या निवडणुकीत भाजपला सत्तेतून घालविणे हा एकच पर्याय असल्याचे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस कॉ. डी. राजा यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केले.

-------
प्रश्न : लोकसभा निवडणुकीनंतर आपण आता विधानसभेच्या रणधुमाळीत राज्यात आला आहात, राज्यातील या विधानसभा निवडणुकीकडे आपण कसे पाहता
उत्तर : मी माझ्या डाव्या पक्षांची भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. ती मी मांडणार आहे. राज्यात जी निवडणूक सुरू आहे, त्यातून मी याविषयी इतकेच सांगेन की, राज्यात असलेली भाजपा- सेना युती येथील जनतेनी यांना सत्तेतून घालवली पाहिजे. आणि दुसरीकडे नवीन राजकीय पर्याय उभा राहण्याची गरज आहे. आणि या पर्यायासाठी यासाठी आम्ही लढत आहोत.
प्रश्न : राज्यात निवडणुकांमध्ये भाजपाकडून काश्मीर आणि ३७० कलम यांचा विषय समोर केला जातोय, त्यावर आपण काय सांगाल?
उत्तर : हेच मोठे राज्याचे आणि देशाचेही दुर्भाग्य आहे. निवडणूक राज्यातील असताना अशा प्रकारचे मुद्दे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित करत आहेत. परंतु हेच लोक महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यां आत्महत्या यावर मात्र एक शब्दही बोलत नाहीत. नाशिक ते मुंबईपर्यंत शेतकऱ्यांनी एक पायी पदयात्रा काढली, परंतु या सरकारने त्यांच्या तोंडाला पाने पुसली. सबका साथ सबका विकास म्हणणारी भाजपा ही देशातील आणि राज्यातील शेतकऱ्यांसोबत नाही, हे यातून स्पष्ट होते. भाजपा केवळ उद्योगपती आणि अदानी- अंबानी यांना मदत करत असून त्यांच्यासाठीच काम करताना दिसते, त्यामुळे देशातील शेतकरी, तरुण, बेरोजगार आणि युवकांसाठी ते काहीही बोलत नाहीत, म्हणूनच आमच्या डाव्या पक्षांसोबत राज्यातील विरोधी पक्षांनी या निवडणुकीत खरे तर हे मुद्दे लावून धरले पाहिजे.
प्रश्न : देशात मोठ्या प्रमाणात रोजगार संपत चालेले आहेत, कंपन्या बंद होत आहेत अशा वेळी डाव्या संघटनांना उभारी घेण्याची संधी मिळेल असे आपल्याला वाटते का?
उत्तर : आमच्या डाव्या पक्ष संघटनांचा रोजगार, नोकरी यासाठी कायम पुढाकार असतो. कोणत्याही सार्वजनिक उद्योगाचे खासगीकरण करू नये, अशी आमची भूमिकाच आहे. अशा वेळी मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत हिंदू राष्ट्र आणि हिंदू संस्कृतीवर बोलत आहेत. परकीय गुंतवणुकीचे समर्थन करत असतात. आणि दुसरीकडे देशातील सार्वजनिक क्षेत्राचे खासगीकरण करून ते सर्व उ‌द्योग ठराविक उद्योगपतींच्या घशात घालत आहेत. पीएमसी घोटाळ्या लोक रस्त्यावर आलेले असताना मोदी- आणि अमित शहा हे दोघेही एक शब्द बोलत नाहीत. यावर केवळ डाव्या पक्ष संघटना आणि विरोधी पक्ष काम करताना दिसत नाहीत. ज्यांचे पैसे आहेत, ते सर्व गरीब लोक आहेत. ही वस्तुस्थिती आहे.

प्रश्न : या निवडणुकीत भाजपाच्या विरोधात जी तिसऱ्या आघाडी आहे, ती एकसंघ असल्याचे दिसत नाहीत यावर आपल्या काय वाटते
उत्तर : सीपीएमसोबत आम्ही सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष, लोकशाहीवादी पक्ष आदी सर्व मिळून एकत्र येत येथून भाजपाला हटवले पाहिजे. ज्या लोकांनी भाजपाला सोबत दिली त्याही पक्षांना सत्तेतून हटवले पाहिजे. आम्ही राज्याती सीपीआय राज्यात १६ जागांवर निवडणूक लढवत आहोत. त्या ठिकाणी इतर पक्षांनी आम्हाला मदत करून इतर ठिकाणी भाजपाला हटवले पाहिजे, असेही आवाहन आमच्या पक्षाकडून केले जात आहे. आज डाव्या पक्ष संघटना या सामाजिक न्याय यावर कायम भर देत असतात. त्यावर काँग्रेस, वंचित यांनीही आपली भूमिका घ्यायला पाहिजे. तरच फॅसिस्ट विचारांचा योग्य मुकाबला करू शकतात. मात्र जनतेत जाण्याची गरज आहे, त्याशिवाय काही होणार नाही. Body:मुलाखत : डी. राजा , सरचिटणीस, भारतीय कम्युनिस्ट पक्षConclusion:
Last Updated : Oct 18, 2019, 9:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.