मुंबई : नाशिकच्या निफाड येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची भेट देण्यासाठी राज्याचे माजी राज्यमंत्री बच्चू कडू काही दिवसापूर्वी भेट घेण्यासाठी गेले होते मात्र बच्चू कडू यांची गाडी रस्त्याच्या मध्ये अडवत एका वयोवृद्ध नागरिकाने बच्चू कडू यांना चांगलेच खडसावलं होतं. उद्धव ठाकरे यांच्यासोबत गद्दारी का केली? असा सवाल या वृद्ध व्यक्तीने बच्चू कडू यांना विचारला होता याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाल्यानंतर याबाबत अधिवेशनात आल्यानंतर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिला आहे. आपण कधीही सामान्य नागरिकांबरोबर गद्दारी केलेली नाही आपण पक्षासोबत गद्दारी करू शकतो. मात्र, राज्यातील सामान्य नागरिकांबरोबर गद्दारी करू शकत नाही असे विधानभवनात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरे यांना सोडून का गेले? : उद्धव ठाकरे यांना सोडून का गेले? असा प्रश्न आपल्याला विचारण्यात येतो. मात्र उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादी यांच्याकडे का गेले? ते राज्याच्या भल्यासाठी गेले होते का? मुख्यमंत्री पदासाठी गेले होते महाविकास आघाडीचे सरकार असताना अडीच वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी राज्याचा काय भलं केलं? असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच कोविडमध्ये मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी उत्तम काम केलं. मात्र त्यातही त्यांनाआरोग्यमंत्री राजेश टोपे यांची साथ होती. उद्धव ठाकरे यांनी विचारा सोबत गद्दारी केली. मात्र मी सामान्य नागरिकांसाठी गद्दारी केलेली नाही मी गद्दार नाही असे स्पष्टीकरण बच्चू कडू यांनी यावेळी दिले. मला सामान्य माणसाने निवडून दिल आहे. माझी गद्दारी पक्षासोबत होऊ शकते मात्र सामान्य नागरिकांसोबत माझी गद्दारी होणार नाही. आपण सामान्य नागरिकांसाठी कधीही उपलब्ध असतो वयोवृद्ध, तरुण सर्व नागरिक कधीही आपल्याला भेटायला येतात.
राष्ट्रवादीवर टीका : त्या गावात राहणारे वयोवृद्ध होते. त्यांच्याबद्दल मला आदर आहे. मात्र त्यांना कसं कळलं की बच्चू कडू तिथे कार्यक्रमासाठी येणार आहे? असा सवालही कडू यांनी उपस्थित केला. जे खोके घेतले म्हणतात त्यांच्या घरात किती खोके आहेत हे लवकरच बाहेर येईल. ज्यांनी हा नारा काढला त्यांनी नागालँडमध्ये युती केली. त्यांनी तिथे काय घेतले असा सवाल ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बच्चू कडू यांनी विचारला आहे. सध्या गावागावांमध्ये सामान्य नागरिक राजकारण करू लागला आहे मात्र हे राजकारण करत असताना आई-वडिलांपेक्षाही आपल्या नेत्याला जास्त महत्त्व दिलेलं पाहायला मिळते. आई-वडिलांसाठी कधीही बॅनर लावले गेलेले नाहीत मात्र सध्या गावागावात आपल्या नेत्यासाठी बॅनरबाजी केलेली गावागावात पाहायला मिळते असाही टोला सध्याच्या परिस्थितीवर बच्चू कडू यांनी लगावला आहे.
बजेटची अंमलबजावणी होणे आवश्यक : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडला हा अर्थसंकल्प चांगला असला तरी यामध्ये अनेक बाबींची उणीव जाणवत आहे. सर्वच घटकांसाठी या अर्थसंकल्पात काही ना काही देण्याचा प्रयत्न केला गेला आहे मात्र बजेटची अंमलबजावणी झाली तरच सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शेवटच्या घटकापर्यंत ती मदत पोहोचली जाईल. या अर्थसंकल्पात शेतमजूर, घरकाम करणाऱ्या नागरिकांसाठी काही नाही. दिव्यांग नागरिकांसाठी घरांची मागणी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आपण करत आहोत मात्र या बजेटमध्येही याचा उल्लेख केला गेलेला नाही अशी खंतही बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केली.
हेही वाचा - Aaditya Thackeray Allegation : खते खरेदी करण्यासाठी विचारली जात; आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, आम्ही जातीचे..