ETV Bharat / state

अनुदान न दिल्यास 9 सप्टेंबरपासून सर्व कॉलेज बंद ठेऊ; शिक्षकांचा शासनाला संतप्त इशारा - mumbai

शिक्षक आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. मात्र, शिक्षकांच्या मागण्यांवर अजूनही तोडगा न निघाल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. सरकारने जर शिक्षकांच्या मागण्यांना दाद दिली नाही, तर ९ सप्टेंबरपासून एकही कॉलेज सुरु होऊ देणार नाही, असा इशारा सर्व शिक्षकांनी दिला आहे.

आंदोलन करताना शिक्षक
author img

By

Published : Aug 27, 2019, 5:52 PM IST

Updated : Aug 27, 2019, 6:06 PM IST

मुंबई - शिक्षक आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. मात्र शिक्षकांच्या मागण्यांवर अजूनही तोडगा न निघाल्याने शिक्षक आक्रमक झाले आहेत. शिक्षकांनी थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, सोमवारी आक्रमक शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. त्यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. सरकारने जर शिक्षकांच्या मागण्यांना दाद दिली नाही, तर ९ सप्टेंबरपासून एकही कॉलेज सुरु होऊ देणार नाही, असा इशारा सर्व शिक्षकांनी दिला आहे.

आंदोलन करताना शिक्षक

यावेळी महत्त्वाची बाब म्हणजे, नुकतेच शिक्षक आमदार नागो गाणार आले होते. मात्र, त्यांना संतप्त शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. राज्यातील विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थ विभागाने तरतूद केली होती. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर ८ दिवसात कॅबिनेटची बैठक घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. त्याचबरोबर येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षकांचे वेतन सुरू होईल, असे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी आश्वासन दिले होते. मात्र, त्याच्या पूर्ततेसाठी मंत्रालयात कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून आली नाही. त्यामुळे अनुदानाची आशा मावळलेल्या शिक्षकांचे मुंबईतील आझाद मैदानावर गेल्या पंधरा दिवसांपासून अर्धनग्न आंदोलन सुरू असून काल शिक्षक अधिक आक्रमक झाले होते.

शिक्षक मोठ्या संख्येने आझाद मैदानातून थेट मंत्रालायवर निघाले असताना पोलीस व शिक्षक यांच्यात तणावाची परिस्थिती दिसली. शिक्षक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला होता. त्यामुळे अशी घटना पुन्हा होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ वर्षांपासून खोटी आश्वासने, खोटी माहिती व भूलथापा देण्याचेच कार्य केल्याचा आरोप या शिक्षकांनी केला आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक शालेय शिक्षकांनी पुन्हा एकदा शेवटचे धरणे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरु केले आहे. काही लोक नग्न अवस्थेत सरकारचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आझाद मैदानात बसले आहेत. पण त्यांची दखल कोणीही घेत नसल्यामुळे ते मैदान सोडून थेट मंत्रालयात जायला निघाले तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले.

शासनाने मार्च २०१८ च्या मुंबई येथील अधिवेशनात १४६ उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी घोषित केले. मार्च २०१९ च्या अधिवेशनात १६५६ उच्च माध्यमिक शाळांना अघोषित ठेवून या सर्वाची म्हणजे १४६+१६५६ शाळाची अनुदानाची गेल्या अधिवेशनात आर्थिक तरतूद सुध्दा केली. त्यासंबंधी सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झालेले असून आता फक्त १६५६ उच्च माध्यमिक शाळांची घोषणा व त्यासंबंधी शासन निर्णय काढणे बाकी आहे. या कामासाठी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांनी विना विलंब शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय जाहीर करावा, अशी शिक्षकांची मागणी आहे.

त्याचबरोबर शासनाने शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत थकीत पगार जमा करुन वेतन देण्याची मागणी शिक्षकांनी केली आहे. या मागण्या मान्य न केल्यास येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील संपूर्ण शिक्षकांकडून मांत्रालयासमोर आत्महत्या केली जाईल, असा इशारा शिक्षकांकडून देण्यात आला आहे. असे झाल्यास याला पूर्णपणे महाराष्ट्र शासन जबाबदार राहील, असेही शिक्षकांनी सांगितले आहे.

Intro:आक्रमक शिक्षकांनी आत्महत्या करण्याचा इशारा सरकारला देत;अनुदान दिलें नाही तर 9 सप्टेंबर पासून कॉलेज सुरू होऊ देणार नाही असाही दिला इशारा

शिक्षक आंदोलनाचा आज पंधरा दिवस आहे.मात्र अजूनही तोडगा न निघाल्यामुळे शिक्षक आक्रमक झाले आहेत .आक्रमक झालेल्या शिक्षकाने थेट आत्मदहनाचा इशारा दिला आहे.. सोमवारी आक्रमक शिक्षकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला होता. यामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात होता.शिक्षकांनी जर सरकारने दाद दिली नाही तर 9 सप्टेंबरपासून एकही कॉलेज सुरु होऊ देणार नाही असा इशारा आता सर्व शिक्षकांनी दिला आहे .महत्त्वाची बाब म्हणजे नुकतेच शिक्षक आमदार नागो गाणार आले होते मात्र त्यांना संतप्त शिक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार सामोरे जावे लागले.

राज्यातील विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यासाठी अर्थ विभागाने तरतूद केली. त्यासाठी नेमलेल्या उपसमितीच्या बैठकीनंतर आठ दिवसांत कॅबिनेटची बैठक घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावू व येत्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी शिक्षकांचे वेतन सुरू होईल, या राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांच्या आश्वासनपूर्तीसाठी मंत्रालयात कोणतीही सकारात्मक हालचाल दिसून येत नसल्याने पुन्हा अनुदानाची आशा मावळलेल्या शिक्षकांनी मुंबईत आझाद मैदानावर गेल्या पंधरा दिवसापासून अर्धनग्न आंदोलन केले आहे.ते आंदोलन काल तीव्र झाले होते. शिक्षक आझाद मैदानातून थेट मंत्रालायवर मोठ्या संख्येनं निघाले असताना. पोलीस व शिक्षक यांच्यात तणावाची परिस्थिती दिसली.शिक्षक आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांवर लाठीमार केला.आज शिक्षक पुन्हा आक्रमक होऊ काही होऊ नये त्यासाठी चोक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ वर्षापासून खोटी आश्वासने, खोटी माहिती व भूलथापा देण्याचेच कार्य केल्याचा आरोप या शिक्षकांचा आहे.यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानीत उच्च माध्यमिक शालेय शिक्षकानीं पुन्हा एकदा आता शेवटचे हे धरणे आंदोलन संपूर्ण राज्यात सुरु केले आहे काही जण नग्न अवस्थेत सरकारच लक्ष केंद्रित करण्यासाठी आझाद मैदानात बसले आहेत.पण त्यांची दखल कोणीही घेत नसल्यामुळे थेट ते मैदान सोडून मांत्रालयात जायला निघाले पोलिसांनी त्याना बेरिगेट लावून अडवले आहे.

शासनाने मार्च २०१८ च्या मुंबई येथील अधिवेशनात १४६ उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी घोषीत केले. मार्च २०१९ च्या अधिवेशनात १६५६ उच्च माध्यमिक शाळांना अघोषीत ठेवून या सर्वाची म्हणजे १४६+१६५६ शाळाची अनुदानाची गेल्या अधिवेशनात आर्थिक तरतूद सुध्दा केली.त्यासंबंधी सर्व शासकीय सोपस्कार पूर्ण झालेले असून आता फक्त १६५६ उच्च माध्यमिक शाळांची घोषणा व त्यासंबंधी शासन निर्णय काढणे बाकी आहे.या कामासाठी शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांनी विना विलंब शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन निर्णय जाहीर करावा.

तसेच शिक्षकांच्या खात्यावर त्वरीत थकीत पगार जमा करुन वेतन देण्याची मागणी केली आहे.अशा विविध मागण्या घेऊन शिक्षक पुन्हा आंदोलनाला बसले मागण्या मान्य करा अन्यथा येणाऱ्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षक मांत्रालया समोर आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला आहे. तसेच याला महाराष्ट्र शासनच पूर्णपणे जबाबदार राहील असे शिक्षकांनी सांगितलेBody:व्हिज्युअल आणि चौपाल मोजोवरून अपलोड केलं आहेConclusion:null
Last Updated : Aug 27, 2019, 6:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.