ETV Bharat / state

राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री घेणार आज बैठक - उद्धव ठाकरे कोरोना महामारी न्यूज

पावसाळा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांबरोबर बैठक घेणार आहे.

उद्धव ठाकरे
राज्यातील सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांबरोबर मुख्यमंत्री घेणार आज बैठक
author img

By

Published : Jun 6, 2021, 3:42 PM IST

मुंबई - पावसाळा आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील सर्व जिल्हा अधिकारी, विभागीय आयुक्त, पोलीस अधीक्षक आणि महापालिका आयुक्तांबरोबर बैठक घेणार आहेत. या बैठकीत जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीवर आणि अनलॉक बाबत महत्त्वाची चर्चा होणार आहे.

कोरोनाच्या घेणार आढावा -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी सध्या राज्यभरात 15 जूनपर्यत लॉकडाऊन लागू करण्यात आलेला आहे. मात्र, आता कोरोनाची रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत असताना राज्य सरकार आता अनलॉकच्या दिशेने जात आहेत. तसेच काही जिल्हात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आलेली आहे. मात्र, 15 जिल्हात कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट जास्त असल्याने त्या जिल्हात अद्यापही शिथिलता दिली गेलेली नाही. राज्य सरकारने 15 जूनपासून अनलॉक करण्याचा विचारत आहे. त्यामुळे आज राज्यातील संपुर्ण जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्यासमावेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेणार आहेत. या बैठकीत सर्व जिल्हयाच्या अधिकारी वर्गाशी चर्चा करून काही महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे.

पावसाळ्याच्या तयारीचा आढावा -
अवघ्या काही दिवसांवरच पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे मान्सूनपूर्व कामाचा आढावा सुद्धा आजच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. तसेच पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तींचा अंदाज घेऊन सर्व यंत्रणांनी सज्ज राहण्यासाठी आदेश सुद्धा मुख्यमंत्री या बैठकीत देणार आहेत. याशिवाय पावसाळ्यामध्ये ज्या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होते. अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी उपायोजनांवर चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.