ETV Bharat / state

लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ हे दोन्हीही महापुरुष 'शब्दप्रभू' - मुख्यमंत्री

author img

By

Published : Aug 1, 2020, 7:25 PM IST

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक योगायोग आहे. या दोन्ही महापुरुषांबद्दल आपण काय बोलावे यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय घ्यावे, हे अधिक महत्वाचे आहे. हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

Uddhav thackeray comment on Lokmanya Tilak  Lokmanya Tilak news  Lokmanya Tilak latest news  Lokmanya Tilak and Annabhau sathe  लोकमान्य टिळक न्यूज  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  Annabhau sathe news
मुख्यमंत्री

मुंबई - लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी हे एकत्र असणे एक योगायोग आहे. या दोन्ही महापुरुषांबद्दल आपण काय बोलावे यापेक्षा आपण त्यांच्याकडून काय घ्यावे, हे अधिक महत्वाचे आहे. हे दोन्ही महापुरुष शब्दप्रभू होते, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन, मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृती शताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी समारोह कार्यक्रम ऑनलाइन आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार विनायक राऊत, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव राजीव जलोटा, संचालक डॉ. धनराज माने, तंत्र शिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यासह सर्व अकृषी विद्यापीठाचे, विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले होते.

अण्णाभाऊंचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ पूर्ण होऊ शकत नाही
या दोन्ही महापुरूषांकडे मत-हिंमत आणि किंमत होती. स्वतःचे मत होते आणि ते मत मांडण्याची हिंमत त्यांच्यात होती आणि त्याही पलीकडे जाऊन होणारे परिणाम आणि त्यासाठी मोजावी लागणारी किंमत हे सगळे पचविण्याची ताकद त्यांच्यात होती. कोणत्याही परिणामांची पर्वा न करता त्यांनी आपले परखड मत मांडले, तर दुसरीकडे अण्णाभाऊंचे नाव घेतल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्र चळवळ पूर्ण होऊ शकत नाही. त्यांच्या साहित्यातून त्यांनी जनजागृती करून चळवळीला नवसंजीवनी देऊन एक चैतन्य निर्माण केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भारतीय समाजामध्ये चेतना निर्माण करण्याचे काम लोकमान्य टिळकांनी केले आहे. स्वातंत्र्याच्या लढाईचा पाया रचण्याच्या कार्यामध्ये ते अग्रस्थानी होते. सर्वांना एकत्र घेऊन लढण्याची ताकद त्यांच्यात होती.

अण्णाभाऊ साठे यांनी दर्जात्मक साहित्य निर्माण केले.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत म्हणाले की, टिळक यांचा ज्या रत्नागिरी जिल्ह्यात जन्म झाला तेथील मी लोकप्रतिनिधी आहे, याचा मला अभिमान आहे. या माध्यमातून या कार्यक्रमाची संकल्पना निर्माण झाली. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक स्मृतीशताब्दी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दीनिमित शासन आणि विद्यापीठ स्तरावर पुढे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. या दोन्ही महापुरूषांच्या नावे मुंबई विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू केले जाणार आहे. यासाठी शासनाकडून सर्व सहकार्य केले जाईल. चरित्र साधने समितीच्या माध्यमातून आपण महापुरुषांची चरित्रे प्रकाशित करीत असतो. आजच्या या दिनी छत्रपती शिवाजी महाराज चरित्र साधने समिती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक चरित्र साधने समितीचा शासन निर्णय जाहीर करण्यात येणार आहे. या माध्यमातून महापुरूषांचे कार्य सगळ्यांना उपलब्ध होईल.

लोकमान्य टिळक यांच्या नावे रत्नागिरी येथे स्मारक आणि ग्रंथालय आहे. या ग्रंथालयाला १०० वर्ष पूर्ण झाली आहेत. या दोन्ही ऐतिहासिक वास्तूला शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती सामंत यांनी यावेळी केली.

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्य लढ्याला विलक्षण अशी दिशा टिळकांनी दिली. हजारो-लाखो क्रांतिवीरांना प्रेरणा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या संकल्पनेतून सामाजिक एकता त्यांनी निर्माण केली. त्यांनी शिवजयंती महोत्सव संपूर्ण देशभर साजरा करण्यास सुरुवात केली. अण्णाभाऊ साठे यांनी वर्गरहित समाजाचे स्वप्न बाळगले. शाळेची पायरी न चढलेल्या अण्णा भाऊंनी विपुल साहित्य निर्माण केले आहे. त्यांच्या साहित्यात प्रांजळपणा आहे, वास्तवता आहे. त्यांचे साहित्य जगातील विविध परकीय भाषेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी संगितले.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे स्वातंत्र्य लढ्यात महत्वपूर्ण योगदान आहे. त्यांनी आपल्या तत्वांशी कधीही तडजोड केली नाही. अण्णाभाऊंनी तळागाळातील लोकांना उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्य केले आहे. लोककलेला सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केल्याचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.