मुंबई - प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात, राजीनामा घेणे किंवा गुन्हा दाखल करणे यातून काही साध्य होत नाही. गुन्हा घडल्यानंतर त्याची चौकशी सुरू आहे, त्यातून सत्य बाहेर येईल, त्यातील आरोपीला क्षमा होणार नाही. चौकशी झाल्यानंतर दोषींवर योग्य कारवाई केली जाईल. वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे, त्याबरोबर पत्रसुद्धा मिळाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले.
पूजाच्या आई-वडिलांनी मुख्यमंत्र्यांना भेटून पत्र दिले आहे. मुलीच्या मृत्यूसंदर्भात उलट-सुलट बातम्या येत आहेत. संजय राठोड यांच्या राजीनाम्याची आम्ही मागणी केली नाही. परंतु, संशयावरून कुणावरही आरोप करू नयेत. संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. त्यांचे काम मोठे आहे. त्यांच्या नावाने राजकारण केले जात आहे. यासारखे दुर्दैव नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकरणाचा सखोल तपास होईल. गुन्हेगार कुणीही असला तरी त्याला शिक्षा होणारच, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री म्हणाले -
एक वर्ष कोविडमध्ये गेले, अजूनही धोका आहे, कोरोना वाढत चालला आहे. दुसरी लाट वाढू न देता, उपचार देत आहोत. 8 तारखेला अर्थसंकल्प सादर होईल. इतर विधेयक देखील मांडण्यात येतील, विरोधी पक्ष नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले, कशाचे काही नाही आणि आरोप केले. कोविड काळात भ्रष्टाचार झाला असा आरोप त्यांनी केला, पण कोविडवर मध्यम कसा मार्ग काढला हे सर्वांना माहीत आहे. त्यांची कीव वाटते, कारण धारावीची जागतिक पातळीवर दाखल, दुतोंडी विरोधी पक्ष आहे.
ते सावरकरांवर बोलले पण त्यांना पुण्यतिथी आणि जयंतीमधील फरकही माहीत नाही. सीमा प्रश्नाबद्दल तुम्ही एकत्र असाल तर केंद्रात राज्यात तुम्ही असताना का काही केले नाही. तुमची भूमिका आमच्या सोबत यायची असेल तर सीमा वाशियांना न्याय देऊ. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी सहकार्य करायचे आश्वासन दिल्याने मी धन्यवाद देतो. कोणत्याही विषयावर काही तरी बोलायला पाहिजे म्हणून ते बोलतात.