ETV Bharat / state

'म्हणे.. आता मीच होणार ब्रँड अ‌ॅम्बेसेडर' - cm uddhav thackrey interview to saamana

ब्रॅन्ड अ‌‌ॅम्बेसेडर नेमण्याऐवजी मुख्यमंत्र्यांनी स्वत:च आता पर्यटनस्थळी, जंगल, तीर्थक्षेत्रस्थळी जाण्याचा निर्णय घेतला आहे. सामना या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

cm uddav thackrey
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
author img

By

Published : Feb 4, 2020, 11:53 AM IST

मुंबई - आता राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी ब्रॅन्ड अ‌ॅम्बेसेडर (सदिच्छादूत) नेमण्याऐवजी स्वत:च त्या त्या ठिकाणी जाणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. सामना या दैनिकाला दिलेल्या या मुलाखतीत ते बोलत होते. सामनाचे संपादक आणि शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली.

यावेळी ते म्हणाले, सरकार एखाद्या प्रतिभावान व्यक्तीची ब्रॅन्ड अ‌ॅम्बेसेडर म्हणून निवड करते. मात्र, त्यानंतर पुढे त्यांना काय करायचे आहे याबद्दल त्यांना काहीच सांगितले जात नाही. यावेळी ती व्यक्ती सुरुवातीला खूश असते. मात्र, नंतर तिला काहीच सांगितले जात नाही. म्हणून पर्यटनस्थळे, जंगल, लेणी आणि तीर्थक्षेत्रांसाठी ब्रँड अ‌ॅम्बेसेडर निवडण्याऐवजी ते स्वत: तिथे जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तर मला फोटोग्राफीचा छंद असल्याने सोबत कॅमेरा ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगतले.

हेही वाचा - 'बुलेट ट्रेन 'त्यांचा' ड्रीम प्रोजेक्ट; मात्र, जाग आल्यावर वस्तुस्थिती समोर येते'

नाईटलाईफचा अर्थ 'मौजमजा' नाही तर...

सध्या मुंबईतील नाईटलाईफ हा चर्चेचा मुद्धा ठरत आहे. यावर ते म्हणाले, नाईटलाईटचा अर्थ मौजमजा, छंद किंवा पब्ज, बार असा नाही. मुंबईकर हा दिवसभर काम करून थकूनभागून संध्याकाळी उशिरा घरी जातो. तोपर्यंत सर्व बंद झालेले असते. म्हणून रात्री कुटुंबासोबत रात्री जेवायला जाणे यालासुद्धा नाईटलाईफ म्हणू शकतो.

विरोधी पक्षाने आरोप केला होता की, नाईटलाईफमुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल, पोलिसांवर ताण येईल. यावर ते म्हणाले, विरोधी पक्षाचा हा गैरसमज आहे. विरोधी पक्ष रात्री झोपत असले तरी आपला पोलीस 24 तास जागा असतो. याप्रकारे त्यांनी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेल्या नाईटलाईफच्या भूमिकेचे त्यांनी समर्थन केले.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.