देशातील सर्व नागरिकांचं लसीकरण झालं पाहिजे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठा आरक्षणासंदर्भात केंद्राने भूमिका घ्यावी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधानांकडे मागणी - cm uddhav thackeray delhi tour
13:27 June 08
13:27 June 08
सत्तेत एकत्र नसलो याचा अर्थ नातं तुटलं असं नाही - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
13:26 June 08
मी नवाज शरीफला भेटायला नाही जाणार. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्यक्तीगत भेट स्वाभाविक आहे. - उद्धव ठाकरे
13:25 June 08
राज्य सरकारकडून पंतप्रधान मोदींमोर ठेवण्यात आलेली भूमिका -
- मराठा आरक्षण बाबत केंद्राने भूमिका घ्यावी
- ओबीसी राजकीय आरक्षण
- मागासवर्गीयांच्या पदोन्नतीतील आरक्षण
- मेट्रो कारशेडचा मुद्दा
- केंद्राकडून जीएसटीचा परतावा मिळावा
- पीकविमा शर्ती शिथिल कराव्या
- राज्यात बल्क ड्रग पार्क तयार करण्याबाबत चर्चा
- चक्रीवादळ्याचे मदतीचे निकष बदलावे
- 14 व्या वित्त आयोगाचा निधी द्यावा
- मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा
13:19 June 08
राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा मुद्दाही पंतप्रधान मोदींसमोर मांडण्यात आला आहे.
13:18 June 08
उपमुख्यमंत्री अजित पवार -
दीड तास चर्चा झाली. ओबीसीचे राजकीय आरक्षणाला स्थगिती देण्यात आली आहे. 56 हजार जागांवर याचा परिणाम होणार आहे. एससी, एसटी, ओबीसी आरक्षण कायम ठेवण्यासाठी घटनेत दुरुस्ती करण्याची मागणी, 2021 मध्ये ओबीसींची जनगणना करण्यात यावी. जीएसटीचा परतावा द्यावा, पिकविम्याबाबत बीड मॉडेल सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात यावे, अशी विनंतीही त्यांना करण्यात आली.
गेल्या पाच वर्षात राज्यात 4 वेळा चक्रीवादळ आली. सिंदुदुर्ग, रत्नागिरी, कोकण परिसराला फटका बसला. यामुळे किनारा भिंत बांधण्यासाठी 5000 कोटी रुपये लागतात. त्याचा आराखडा तयार करण्यात आली आहे. त्याबाबत मागणी करण्यात आली. 14 व्या वित्त आयोगासंदर्भात कामगिरी अनुदानाचा थकित 1 हजार 444 कोटी निधी देण्यात यावा. पंतप्रधानांना एकूण 12 मुद्दे मांडण्यात आले.
13:09 June 08
मराठा आरक्षण उपसमितीचे प्रमुख अशोक चव्हाण -
मराठा आरक्षणासंदर्भात त्यांना कल्पना देण्यात आली. मराठा आरक्षणासंदर्भातील 5 मे2021 च्या निर्णयाबाबत त्यांना सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यांना विनंती करण्यात आली की, राज्यांना अधिकार बहाल करण्यासोबतच जोपर्यंत 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करण्यात यावी, असा युक्तिवाद केंद्र सरकारकडूनही सर्वोच्च न्यायालयात करण्यात यावा, असेही पतंप्रधानांना सांगण्यात आले.
पुनर्विचार याचिकेसोबतच राज्य सरकारला अधिकार देण्यात यावे. जोपर्यंत घटनादुरुस्ती होत नाही, तोपर्यंत सर्व अधिकार केंद्राकडे आहेत. त्यामुळे मराठा समाजाला, ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी केंद्र सरकारने याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी पंतप्रधानांकडे केल्याची माहितीही त्यांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या बाबतीत महाविकास आघाडीने सकारात्मक भूमिका घेतली. आता केंद्र सरकारनेही सकारात्मक भूमिका घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
12:54 June 08
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे -
एका वर्षानंतर दिल्लीत आलो. सर्वांनाच या भेटीचे कारणही माहित आहे. व्यवस्थित चर्चा झाली. सर्व विषय गांभीर्याने त्यांनी एकून घेतली. या विषयात ते लक्ष घालणार, असे त्यांनी सांगितले. त्यांच्याकडे मांडलेले विषय ते सकारात्मक पद्धतीने ते सोडवतील असा विश्वास आहे.
राज्यातील संवेदनशील विषय मराठा आरक्षण आहे. ओबीसी राजकीय आरक्षण, भरतीमधील आरक्षण, तसेच मेट्रोसाठी कारशेड, जीएसटीचा मुद्दा, पीकविमा मधील शर्ती याविषयांवर चर्चा झाली.
गेले काही वर्ष किनारपट्टीच्या भागाला चक्रीवादळाचा सामना करावा लागतो. अशावेळी मदतीचे निकष जुने झाले आहेत. ते बदलावेत, अशी विनंतीही त्यांनी केली. 14 व्या वित्त आयोगातील थकित निधी, मराठी भाषा दिनाला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी लवकरात लवकर सूचना द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. त्यांच्याकडून सकारात्मक निर्णय घेतले जातील, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
12:54 June 08
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीतील महाराष्ट्र सदनात दाखल.
12:45 June 08
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातील बैठक संपली. थोड्याच वेळात दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
12:16 June 08
बैठकीबाबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत -
मुख्यमंत्री आरक्षणाच्या बाबतीत खूप काळजीपूर्वक काम करत आहेत, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी दिली. राज्यात मराठा आरक्षणप्रकरणी आंदोलने होत आहेत. मोर्चे निघत आहेत. संभाजीराजे आंदोलनाची भूमिका घेत आहेत. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला वाटत की मराठा आरक्षणाचा मुद्दा ताणला जाऊ नये. आजच्या बैठकीत हा मुद्दा घेऊन गंभीरतेने चर्चा होईल. त्यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा होईल, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
11:14 June 08
पंतप्रधानांसोबतच्या बैठक संपली; मराठा आरक्षणाबाबतच्या अटी शिथिल कराव्या
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक होत आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पत्रकार परिषद घेणार आहेत.
पंतप्रधानांच्या भेटी आधी शरद पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा -
काल सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या देखील पंतप्रधान यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली आहे. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या दरम्यान चर्चा होणाऱ्या मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांचा सल्लाही घेतला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे हेदेखील उपस्थित होते.
राष्ट्रपतींना लिहिलं होतं पत्र -
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांनी याआधीच राष्ट्रपतींना पत्र लिहिले आहे. यासाठी मुख्यमंत्री आणि मराठा आरक्षणाचा उपसमितीच्या सदस्यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राष्ट्रपतीने लक्ष घालावे, अशा आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी राज्यपालांना दिले होते.
कांजूरमार्ग कारशेड प्रश्नी चर्चा होणार -
कांजूरमार्ग कारशेड प्रकरणी महाविकास आघाडीचे सरकार आणि भाजपात मागच्या काही महिन्यांपासून चांगलेच जुपलेले पाहायला मिळाले. मेट्रोचं कारशेड आरे येथेच व्हावे, अशी भाजपचे म्हणणे आहे. तर हे मेट्रोचे कारशेड कांजुर मार्ग येथे व्हावे, यासाठी शिवसेना आग्रही आहे. कांजूरप्रश्नी पंतप्रधानांसोबत चर्चा होणार का? या प्रश्नावर मंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, जे विषय महाराष्ट्र आणि केंद्राशी निगडित आहे त्या सर्व विषयांवर चर्चा होईल.