ETV Bharat / state

CM Eknath Shinde : टाटा एअरबस प्रकल्प राज्याबाहेर; ईटीव्ही भारतच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचे 'टाटा बाय-बाय' - ETV Bharat

राज्यातील आणखी एक प्रकल्प टाटा एअरबसच्या निमित्ताने राज्याबाहेर गेला ( Tata Air Bus project gose out of Maharashtra )आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारतात उत्तर न देता त्यांनी टाटा करत प्रश्नाला बगल दिली. संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने आयोजलेल्या दहशतवाद विरोधी परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

CM Eknath Shinde
टाटा एअरबस प्रकल्प
author img

By

Published : Oct 28, 2022, 5:30 PM IST

Updated : Oct 28, 2022, 6:08 PM IST

मुंबई : राज्यातील आणखी एक प्रकल्प टाटा एअरबसच्या निमित्ताने राज्याबाहेर गेला ( Tata Air Bus project gose out of Maharashtra )आहे. या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारतात उत्तर न देता त्यांनी टाटा करत प्रश्नाला बगल दिली. संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने आयोजलेल्या दहशतवाद विरोधी परिषदेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. नागपूर येथे प्रस्तावित असलेला टाटा एअर बसचा सुमारे 22 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राज्याबाहेर गेला आहे. वेदांता फॉक्स्कोन पाठोपाठ ( Vedanta Foxconn ) सलग दुसरा प्रकल्प गुजरातने पळवला आहे.

मुख्यमंत्र्यांचे टाटा बाय-बाय : या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ईटीव्ही भारतने प्रश्न विचारला असता त्यांनी या प्रश्नावर काहीही उत्तर न देता थेट टाटा बाय-बाय करत पत्रकार परिषदेच्या स्थळावरून काढता पाय ( Eknath Shinde silence on the Tata Air Bus ) घेतला. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्या प्रकल्प कोणामुळे गेला याची जुगलबंदी सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाविषयी बाळगलेले मौन निश्चितच महत्त्वाचे मानले जात आहे. सुमारे 22 हजार कोटी रुपयांचा आणखी एक प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने आता या बदल्यात राज्यात कोणता मोठा प्रकल्प येतो याची उत्सुकता लागून राहिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

दहशतवाद विरोधी लढण्यासाठी जग एकत्र : भारताने नेहमीच दहशतवादाविरोधी आपली भूमिका स्पष्ट आणि ठाम ठेवली आहे. दहशतवाद विरोधी परिषदेमध्ये ( Counter Terrorism Council ) आज संयुक्त राष्ट्र संघाच्यावतीने जगभरातील दहशतवादाचा निषेध करीत दहशतवादा विरोधात एकजूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिषदेत सहभागी झालेल्या सर्व देशांच्या प्रतिनिधींचे आम्ही स्वागत करीत आहोत अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केली.

26 /11 चे व्रण कायम : महाराष्ट्राने विशेषतः मुंबईने दहशतवादाची सगळ्यात मोठा वाईट अनुभव घेतला आहे. मात्र तरीही आम्ही दहशतवादाविरोधी एकजुटीने लढत आहोत आणि यापुढेही लढणार आहोत. दहशतवादी हल्ल्याला मुंबईने सहजपणे तोंड देत त्यावर मात केली आहे. यापुढेही आम्ही दहशतवाद विरोधी असलेला आमचा लढा कायम ठेवणार आहोत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा दहशतवादा विरोधात सर्व राज्यांच्या प्रमुखांची हरियाणा येथे नुकतीच एक बैठक घेतली आहे या बैठकीत सुद्धा दहशतवादा विरोधात एकजुटीने लढण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

सज्जाद मीर आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मवर : 26 /11 हल्ल्यातील मास्टर माईंड मानला जाणारा सज्जाद मिर हा पाकिस्तानात लपला असल्याच्या व्हिडिओ क्लिप्स यापूर्वी वायरल होत होत्या. या क्लिपिंग आज या आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी परिषदेच्या प्लॅटफॉर्मवर सुद्धा मांडल्या गेल्या आहेत. भारताने या भूमिकेचे स्वागत केले असून आता तरी पाकिस्तानने ही गोष्ट मान्य केली पाहिजे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

Last Updated : Oct 28, 2022, 6:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.