ETV Bharat / state

Cm Eknath Shinde on Davos trip : दावोसच्या दौऱ्यात गुंतवणुकीचे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार- एकनाथ शिंदे - agreement held at Davos

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वित्झर्लंड येथील जागतिक आर्थिक मंच (WEF) मध्ये शिष्टमंडळासमवेत सहभागी होणार आहेत. राज्यासाठी भरघोस उत्पन्न मिळवून देऊ, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. जवळपास 20 उद्योगांसमवेत सुमारे 1 लाख 40 हजार कोटींचे करार होणार असून, आजपर्यंत दावोस येथे इतक्या मोठ्या प्रमाणावर प्रथमच महाराष्ट्राचे सामंजस्य करार होत आहेत.

Eknath Shinde Visit Davos
मुख्यमंत्री शिंदे दोन दिवसीय दावोस दौऱ्यावर
author img

By

Published : Jan 13, 2023, 8:15 AM IST

Updated : Jan 13, 2023, 9:25 AM IST

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक आर्थिक मंच (WEF) मेळाव्यासाठी दावोसचा आपला दौरा थोडक्यात आटोपण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. पायाभूत सुविधा व इतर महत्वाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या प्रगतीविषयी जगभरातील मान्यवर, गुंतवणूकदार, तसेच उद्योगांच्या प्रमुखांशीही मुख्यमंत्री संवाद साधणार आहेत.

दावोस भेट सुरळीत पार पडेल : या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, काळजी करण्याची गरज नाही. मी दावोसला जात आहे आणि महाराष्ट्र आणि मुंबईसाठी मोठी गुंतवणूक आणणार आहे. दावोस भेट आणि पंतप्रधानांचा दौरा सुरळीत पार पडेल. आमचे प्रकल्प आणि पंतप्रधान यांच्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही. पंतप्रधान मोदी मुंबईसाठी अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांचा शुभारंभ करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वित्झर्लंडमधील दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा (WEF) दौरा थोडक्यात आटोपण्याचा करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण पंतप्रधान मोदी 19 जानेवारीला मुंबईला भेट देणार आहेत.

उदय सामंत हे देखील दावोसमध्ये सामील : औद्योगिक मंत्री उदय सामंत हे देखील दावोसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सामील होणार आहेत. उदय सामंत दावोसला रवाना होणार आहेत. शिंदे फडणवीस सरकारने राज्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच मुंबई दौरा असेल. त्यांच्या या दौऱ्यामुळे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयाने त्यांच्या दौऱ्याचे अधिकृत वेळापत्रक अद्याप कळवलेले नसले तरी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील एमएमआरडीए मैदानावर १९ जानेवारीला हा कार्यक्रम होण्याची शक्यता आहे. या भेटीमध्ये अनेक पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे.

हेही वाचा : Chief Minister Visit To Davos : मुख्यमंत्री दावोस भेटीतून महाराष्ट्रात किती कोटींची गुंतवणूक आणणार?

उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची अहवालांवर प्रतिक्रिया : अहवालांवर प्रतिक्रिया देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीवर टीका केली. सरकारला बीएमसी निवडणुकीची काळजी असल्याचा आरोप केला. महाराष्ट्रात नवे सरकार पंतप्रधानांना दुसरी तारीख देण्याची विनंती करू शकतात पण दावोसच्या तारखा बदलणार नाहीत. हे बीएमसी निवडणुकीसाठी केले जात आहे. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्रात गुंतवणुकीबाबत गंभीर नाहीत, असा आरोप राऊत यांनी केला.

दाव्होस परिषद नेमकी काय आहे ? जागतिक आर्थिक परिषद (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) ही एक खाजगी संस्था आहे. तीची स्थापना १९७१ साली करण्यात आली होती. या संस्थेचे मुख्यालय स्वित्झर्लंडची राजधानी जिनेव्हामध्ये आहे. या संस्थेला आंतरराष्ट्रीय संस्था म्हणून मान्यता मिळालेली आहे. या संस्थेचे ध्येय जागतिक व्यवसाय, राजकारण, शिक्षण आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींना एकत्र आणून जागतिक क्षेत्रिय आणि औद्योगिक विकासाला चालना देणे आहे. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम निमंत्रण देण्यात आलेल्यांना यामध्ये सहभागी होता येते. या परिषदेत जवळपास २५०० व्यक्ती सहभाग घेतात. त्यात जगभरातील मोठे उद्योगपती, व्यावसायिक आणि अर्थशास्त्रज्ञ यांचा समावेश असतो.

Last Updated : Jan 13, 2023, 9:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.