ETV Bharat / state

CM Eknath Shinde Reaction : बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघेंच्या विचारसरणीचा विजय - मुख्यमंत्री

निवडणुक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण' चिन्ह कायम ठेवले आहे. यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा विजय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले आहे. तसेच आमच्या कार्यकर्त्यांचा, खासदारांचा, आमदारांचा, लोकप्रतिनिधींचा आणि लाखो शिवसैनिकांची ही विजयी पताका असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना बोलतांना दिली आहे.

Eknath Shinde Reaction
Eknath Shinde Reaction
author img

By

Published : Feb 17, 2023, 8:49 PM IST

Updated : Feb 17, 2023, 10:59 PM IST

लाखो शिवसैनिकांचा विजयी

मुंबई : निवडणुक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण' चिन्ह कायम ठेवले आहे. या निर्णयामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसाला आहे. आठ महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत उद्धव ठाकरें सरकारला राजीनामा द्याला भाग पाडले होते. त्यांना 40 आमदारांचा पाठिंबा असल्याने एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हात मिळवत सत्ता स्थापन केली होती. तेव्हापासून शिंदे ठाकरे यांच्यात पक्षावरुन लढाई सुरु होती. आयोगाने दिलेल्या निर्णयामुळे ठाकरे यांच्या हातुन शिवसेना पक्ष गेला आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदे यांच्याकडे 'शिवसेना' आणि 'धनुष्यबाण' चिन्ह कायम

लाखो शिवसैनिकांचा विजय : बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचारसरणीचा विजय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हटले आहे. तसेच आमच्या कार्यकर्त्यांचा, खासदारांचा, आमदारांचा, लोकप्रतिनिधींचा आणि लाखो शिवसैनिकांची ही विजयी पताका असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना बोलतांना दिली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या राज्यघटनेवर हा देश चालतो. त्या संविधानाच्या आधारे आम्ही आमचे सरकार स्थापन केले. आज आलेला निवडणूक आयोगाचा आदेश गुणवत्तेच्या आधारावर आहे. मी निवडणूक आयोगाचे आभार मानतो असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

  • It's the victory of ideologies of Balasaheb & Anand Dighe, of our workers, MPs, MLAs, public representatives&lakhs of Shiv Sainiks. It's victory of democracy:Maharashtra CM Eknath Shinde on EC order on party name “Shiv Sena” & symbol “Bow & Arrow” to be retained by Shinde faction pic.twitter.com/o0fa3tuJUt

    — ANI (@ANI) February 17, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

शिवसेना शिंदेंचीच : बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीवर चालणारी शिवसेना आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना ही मूळची शिवसेना झाली आहे. त्याला माझा सलाम असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी व्यक्त केले आहे. पहिल्या दिवसापासून आम्हाला विश्वास होता. तुम्ही वेगवेगळ्या पक्षांबद्दल आयोगाचे पूर्वीचे आदेश पाहिल्यास शिवसेना शिंदेंचीच होणार हे दिसत होते असे फडवीस म्हणाले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले आहे. मी एकनाथराव शिंदे यांचा मनापासून अभिनंदन करतो, आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की खरी शिवसेना हीच आहे, कारण शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे काम एकनाथ शिंदे करतायेत. आज जो काही निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाले आहे. आमदार, खासदार यांची संख्या लक्षात घेऊनच निर्णय झाला आहे, याचे कारण एखाद्या पक्षाचे त्या पक्षाला मिळालेल्या लोकसंख्येच्या आधारावर असते. मी अजून पूर्ण निकाल वाचलेला, नाही त्यामुळे मी निकालाचा निष्कर्ष काढणार नाही, मात्र एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करतो.

शिवसेनेचा विजय : बाळासाहेब ठाकरेंच्या विचारसरणीवर चालणारी शिवसेना आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची शिवसेना ही मूळची शिवसेना झाली आहे. त्याला माझा सलाम असल्याचे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी व्यक्त केले आहे. पहिल्या दिवसापासून आम्हाला विश्वास होता. तुम्ही वेगवेगळ्या पक्षांबद्दल आयोगाचे पूर्वीचे आदेश पाहिल्यास शिवसेना शिंदेंचीच होणार हे दिसत होते असे फडवीस म्हणाले.

हेही वाचा - Shivsena Party Name Symbol : उद्धव ठाकरेंच्या हातून गेली शिवसेना; पक्षाचे नाव-चिन्ह धणुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे

Last Updated : Feb 17, 2023, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.