मुंबई : मुंबईत मेट्रो चांगलीच चर्चेत आहे. मुंबईत मेट्रोचे जाळे विस्तार आहेत. मुंबई मेट्रो-3 प्रकल्पाचे काम जलदगतीने सुरु आहे. आतापर्यंत 90 टक्के काम पूर्ण झाल्याचा प्रशासनाचा दावा आहे. या कामांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पायी चालत पाहणी करत आढावा घेतला. कुलाबा- वांद्रे- सिप्झ हा भूमिगत मेट्रो मार्ग असलेला मुंबई मेट्रो -३ प्रकल्प आहे. मुंबईतील एकमेव अशा या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. शहरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आणि वाहतुकीच्या पर्यायी व्यवस्थेसाठी हा मार्ग महत्वाचा0 असणार आहे. या मार्गाचे काम प्रगतीपथावर आले असून यामुळे वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. शिवाय, मेट्रोत प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन हा मार्ग बनवण्यात येत आहे. त्यामुळे हवा, ध्वनी प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रस्त्यावरील 'इतकी' वाहने कमी होतील : मुंबई मेट्रो ३ मार्ग हा मेट्रो -१, २,६ आणि ९ यांच्यासहित मोनोरेलला जोडला जाईल. तसेच उपनगरी रेल्वे आणि विमानतळाला जोण्यात येणार आहे. पश्चिम उपनगरकरिता चर्चगेट तर मध्य रेल्वेला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जोडण्याचे प्रस्तावित आहे. जेणेकरून प्रवाशांचा वेळ वाचेल. तसेच रस्त्यावरील सहा लाख वाहने कमी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला. या मार्गाचा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत तर दुसरा टप्पा जून २०२४ पूर्वी पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. राज्याच्या विकासात्मक प्रकल्पाला विलंब होणार नाही, याची खात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. तसेच आरेचा कारशेडचा विषय मार्गी लागला आहे. हा प्रकल्प देखील वेळेत पूर्ण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
'असा' आहे मेट्रो 3 प्रकल्प : कुलाबा-वांद्रे-सिप्झ हा ३३.५ कि.मी. लांबीचा भुयारी मार्ग आहे. मार्गावर २७ स्थानके असून त्यापैकी २६ भुयारी तर एक जमिनीवरुन आहे. प्रमुख व्यवसाय आणि रोजगार केंद्रे, रुग्णालये, शैक्षणिक संस्था, धार्मिक स्थळे, मनोरंजनाच्या सुविधा तसेच उपनगरीय रेल्वेशी न जोडलेल्या काळबादेवी, गिरगाव, वरळी, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानतळ यांसारख्या भागांना जोडणी करतो. २०२४ पर्यंत मेट्रो-३ च्या प्रत्येकी ८ डब्यांच्या ३१ गाड्या कार्यरत होतील. इतर मेट्रो मार्ग, मोनोरेल, उपनगरीय रेल्वे आणि एसटी बस सेवांशी एकत्रित जोडणी करत असून उपनगरीय रेल्वेतील १५% प्रवासी मेट्रो-३ कडे वळतील. सन २०४१ पर्यंत मेट्रो-३ मुळे वाहनांच्या फेऱ्यांमध्ये प्रतिदिन ६.६५ लाखाने घट होईल. मार्गामुळे दरवर्षी २.६१ लाख टन कार्बन डाय ऑक्साईडचे उत्सर्जन कमी होईल.
आरे ते बीकेसी पहिला टप्पा : या मार्गावर १० स्थानके आहेत. त्यापैकी ९ भुयारी, एक जमिनीवर आहे. याचे एकूण अंतर १२.४४ किमी आहे. दोन गाड्यांमधील कालावधी ६.५ मिनिटे आहे. पहिल्या टप्प्यातील गाड्यांची संख्या ९ आहे. मेट्रो ३ मार्गाचे पहिल्या टप्प्यातील एकूण ८७.२ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण ९७.८ टक्के प्रकल्प बांधकाम पूर्ण झाले आहे. एकूण ९३ ट्क्के स्थानक बांधकाम पूर्ण झाले आहे.
एकूण ६५.१ टक्का प्रणालीची कामे पूर्ण झाली आहे. रेल्वे रुळाचे एकूण ८६.३ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सेवेची चाचणी ऑक्टोबर २०२३ पर्यंत सुरू होणे अपेक्षित आहे.
बीकेसी ते कफ परेडचा दुसरा टप्पा : एकूण २१.३५ कि.मी अंतर असलेल्या प्रकल्पावर स्थानके १७ असतील. दोन गाड्यांमधील कालावधी ३.२ मिनिटे आहे. दुसऱ्या टप्प्यातील गाड्यांची संख्या २२ गाड्या आहे. मेट्रो ३ मार्गाचे दुसऱ्या टप्प्यातील एकूण ७६.९ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण ९५.३ टक्के प्रकल्प बांधकाम पूर्ण झाले आहे. एकूण ८८.३ टक्के स्थानक बांधकाम पूर्ण झाले आहे. एकूण ४२.४ टक्के प्रणालीची कामे पूर्ण झाले आहे. रेल्वे रुळाचे एकूण ४६.६ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. हा मार्ग अंदाजे जून २०२४ मध्ये सुरू होणार आहे. मेट्रो ३ मार्गाचे एकूण ८१.५ टक्के काम पूर्ण झाले आहे. एकूण ९२.८ टक्के प्रकल्प बांधकाम पूर्ण झाले आहे. ८९.८ टक्के स्थानकांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. ५०.९ टक्के प्रणालीची कामे पूर्ण झाले आहे. रेल्वे रुळाचे ६१.१ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. भुयारी मार्गाचे १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. ४२ ब्रेकथ्रू संपन्न झाला आहे. डेपोचे ६३ टक्के बांधकाम पूर्ण झाले आहे. सद्यस्थितीत डेपो ३१ गाड्यांच्या देखभालीसाठी सज्ज आहे.
मेट्रो-३ च्या गाड्या : डेपोमध्ये देखभाल आणि कार्यशाळा इमारत कामे, ऑपरेशन कंट्रोल सेंटर,ओव्हरहेड इक्विपमेंट सिस्टम, मेकॅनिकल इलेक्ट्रिकल प्लंबिंगची.कामे, स्टॅबलिंग लाइन, ऑक्झिलरी सबस्टेशन, वॉश प्लांट, रेल्वे रुळ घालणे इत्यादी कामांचा समावेश आहे. आतापर्यंत मेट्रो-३ च्या तीन गाड्या मुंबईत दाखल झाल्या आहेत. अजून दोन गाड्या श्रीसीटी आंध्र प्रदेश येथील ऑस्तोम कारखान्यातून मुंबईकरिता रवाना झाल्या आहेत. १७ किंवा १८ मेपर्यंत या गाड्या मुंबईत दाखल होणे अपेक्षित आहे. यानंतर उर्वरित ४ गाड्या प्रत्येक महिन्यात २ अशा मुंबईत दाखल होतील.
- हेही वाचा : Eknath Shinde News: मुख्यमंत्र्यांनी केली मेट्रो 3 मार्गाची पाहणी, म्हणाले येत्या डिसेंबरपर्यंत ...
- हेही वाचा : Pune Metro : पुणे मेट्रोचे काम 'या' महिन्यात पूर्ण होणार; सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक ते रुबी हॉल स्थानका दरम्यान पार पडली चाचणी
- हेही वाचा : Mumbai Metro Line 3 : मेट्रो रेल्वे लाइन तीनचे बीकेसी स्थानकाचे काम प्रगतीपथावर; अश्विनी भिडे यांनी केली पाहणी