ETV Bharat / state

CM Eknath Shinde : शिंदे गटाकडून 'हे' १२ शिलेदार घेणार मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी - Balasaheb Thackeray Peoples Party Alliance

मुंबई महानगरपालिका निवडणूक तोंडावर आली ( Mumbai Municipal Election ) आहे. त्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागाले आहे. एकनाथ शिंदेंकडून १२ शिलेदारांची निवड करण्यात ( CM Eknath Shinde Appointed 12 Leaders ) आली आहे. जे निवडणूकीची धूरा सांभाळतील. त्याशिवाय भीमशक्ती आणि शिवशक्तीची ताकद एकत्र आली आहे. एकनाथ शिंदे आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीची युती काल मुंबईत झाली.

CM Eknath Shinde
मुंबई महानगरपालिका निवडणूक
author img

By

Published : Jan 5, 2023, 9:47 AM IST

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी आता सुरू झाली ( Mumbai Municipal Election ) आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे गटाला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून आता नवीन रणनीच्या आखल्या जात आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाचा ठसा उमटवण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आपल्या 12 शिलेदारांची निवड केली ( CM Eknath Shinde Appointed 12 Leader s) आहे. या बारा शिलेदारांवर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली असून प्रत्येकावर लवकरच विभाग वार जबाबदारी देण्यात येणार आहे.

महापालिका निवडणुकीची यांच्यावर जबाबदारी : खासदार राहुल शेवाळे, खासदार गजानन कीर्तिकर, आमदार सदा सर्वणकर, आमदार प्रकाश सुर्वे, मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार यामिनी जाधव, आमदार मंगेश कुडाळकर, मुंबई महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती माजी अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार दिलीप लांडे, माजी नगरसेविका शितल म्हात्रे, माजी नगरसेविका कामिनी शेवाळे, उपनेते आशा मामडी या सर्वांवर मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टाकली ( shinde group leaders list for BMC election ) आहे. येणाऱ्या महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना हे एकत्रितरित्या महानगरपालिकेची निवडणूक लढवणार असल्याचे आधीच दोन्ही पक्षाकडून स्पष्ट करण्यात आला आहे. खास करून उद्धव ठाकरे यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापालिकेची सत्ता घेण्यासाठी आखली जात असल्याचे म्हटले जात आहे.

योगेंद्र कवाडे यांच्याबरोबर युती जाहीर : मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समोर ठेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे नेते योगेंद्र कवाडे यांच्यासोबत युती जाहीर ( Balasaheb Thackeray Peoples Party Alliance ) केली आहे. भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र ( Bhim Shakti and Shiva Shakti ) आणून मुंबई महानगरपालिकेवर विजयी पताका लावण्याच्या उद्दिष्टाने ही युती करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत या युतीचा चांगला परिणाम दिसेल अशी आशा शिंदे गटाला ( CM Eknath Shinde ) आहे.

महानगरपालिकेत शिवसेना कार्यालयावर ताब्याचा प्रयत्न : मुंबई महानगरपालिकेत असलेले शिवसेनेचे कार्यालय हे आपले देखील कार्यालय आहे हे सांगून तीन दिवसापूर्वी शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे आली स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी कार्यालयावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. शिंदे गटाचे नेते आणि कार्यकर्ते कार्यालयात शिरले हे समजतात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या आणि नेत्यांकडून कार्यालयात जाऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. त्यामुळे पालिकेमध्ये एकच गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळानंतर पालिका आयुक्तांनी सर्व पक्षांंची कार्यालये सील केली आहेत. मात्र जिथे जिथे शिवसेनेचे कार्यालय आहे. त्या सर्व कार्यालयावर आमचाही अधिकार आहे. अशी ठाम भूमिका शिंदे गटाकडून त्यावेळी घेण्यात आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.