मुंबई: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे कार्यकारणीच्या बैठकीसाठी स्वत: हजर झाले आहेत. शिवसेनेवर आलेले संकट दुर करण्यासाठी उध्दव ठाकरे सक्रिय झाले आहेत. काल झालेल्या पक्षांच्या बैठकीला उध्दव ठाकरे व्हिडीओ काॅन्फरंन्सच्या माध्यमातुन सहभाग नोंदवला होता. ते मातोश्रीवर बसुन कारभार पाहतात असा त्यांच्यावर आरोप होत होता. आज बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित राहुन त्यांनी पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवला आहे. बंडखोर एकनाथ शिंदे तसेच रामदास कदम यांचे नेते पद काढण्या संदर्भात त्याच बरोबर बंडखोर मंत्र्यांच्या मंत्रीपदा बाबतही या बैठकीत निर्णय होण्याची तसेच सगळ्याच बंडखोरां बाबत निर्णय होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. आज होत असलेल्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
-
#WATCH | Maharashtra CM and Shiv Sena leader Uddhav Thackeray arrives at Sena Bhavan in Mumbai. pic.twitter.com/bM8L5PPzV4
— ANI (@ANI) June 25, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH | Maharashtra CM and Shiv Sena leader Uddhav Thackeray arrives at Sena Bhavan in Mumbai. pic.twitter.com/bM8L5PPzV4
— ANI (@ANI) June 25, 2022#WATCH | Maharashtra CM and Shiv Sena leader Uddhav Thackeray arrives at Sena Bhavan in Mumbai. pic.twitter.com/bM8L5PPzV4
— ANI (@ANI) June 25, 2022
हेही वाचा : Maharashtra Political Crises : बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाचं नाव ठरलं..